शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! एनी डेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे सायबर फ्राॅड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 14:53 IST

स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी तर २८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील चार गुन्हे नोंदविले आहेत. एनीडेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे हे सायबर फ्राॅड करण्यात आले.

ठळक मुद्दे एकाच दिवशी चार तक्रारी गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले गुन्हे

अमरावती : कोविड १९चा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच, या काळात सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. ऑनलाइन वॉलेटची, क्रेडिट कार्डची केवायसी, नोकरीचे आमिष अशी विविध कारणे देत सायबर हल्लेखोर लोकांची फसवणूक करत असल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.

स्थानिक गाडगेनगर पोलिसांनी तर २८ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील चार गुन्हे नोंदविले आहेत. एनीडेस्क, टीम व्हूअर, केवायसीच्या नावे हे सायबर फ्राॅड करण्यात आले. तर एका प्रकरणात समाजमाध्यमावर पसंत केलेली दुचाकी पैसे देऊनही आलीच नाही. सायबर गुन्हेतज्ज्ञांच्या मते सायबर हल्लेखोर ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करत आहेत.

एनीडेस्क डाउनलोड केले नि २५ हजार गमावले

मागितलेली वस्तू डिलिव्हर न झाल्याने सूचनेप्रमाणे एनीडेस्क डाऊनलोड केले नि २५ हजार गमावल्याची घटना येथील रोहिणी पार्क परिसरात घडली. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून २८ नोव्हेंबर रोजी दुपारी गाडगेनगर पोलिसांनी दोन मोबाइल क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पत्ता चुकीचे असल्याचे सांगत तेथील एका महिलेला एनीडेस्क डाउनलोड करण्यास सांगितले गेले. ते डाउनलोड केल्यानंतर ओटीपी आला व त्याच वेळी त्या महिलेच्या खात्यातून २५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर झाले. १२ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

टीम व्हूअरने ३० हजारांचा गंडा

बीएसएनएलचे सिमकार्ड बंद होत असल्याची बतावणी करून एका ६२ वर्षीय व्यक्तीला टीम व्हूअर हा ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. सोबतच डेबिट कार्ड नंबर टाकून ३० रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्या वृद्धाच्या पत्नीच्या बँक खात्यातून २४ हजार ५५९ व ५ हजार रुपये कपात झाल्याचे दिसून आले. मार्डी रोडवरील अंबिका नगर येथे ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणीदेखील गाडगेनगर पोलिसांनी एका मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

केवायसीच्या नावावर १५ हजारांचा फ्रॉड

केवायसीच्या नावावर बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवून एका महिलेला १५ हजार रुपयांनी ऑनलाइन गंडा घालण्यात आला. १२ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर रोजीदरम्यान हा घटनाक्रम घडला. याप्रकरणीदेखील २८ नोव्हेंबर रोजी गाडगेनगर पोलिसांत तीन मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फोनपेवर अकाउंट ब्लँक दाखवत आहे, केवायसी करायची आहे, असा संदेश त्या महिलेच्या मोबाइलवर आला होता. त्यानंतर ही फसवणुकीची घटना घडली.

दुचाकी आलीच नाही, २१ हजार गेले

इन्स्टाग्रामवर बुक केलेली दुचाकी २१ हजार रुपये देऊनही मिळाली नाही. त्यात तब्बल पावणेदोन महिन्यांनी गाडगेनगर पोलिसांत अरुणा राणा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी आपली दुचाकी डिलिव्हर होईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे सरस्वतीनगरमधील एका महिलेने २१ हजार ३७९ रुपये डिलिव्हरीपूर्वीच संबंधिताला ऑनलाइन ट्रान्सफर केले. दुचाकी न आल्याने झालेली फसवणूक त्या महिलेच्या लक्षात आली. व सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइनfraudधोकेबाजी