अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत साेहळा २४ जून रोजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 19:55 IST2023-06-17T19:55:01+5:302023-06-17T19:55:37+5:30
Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा २४ जून रोजी सकाळी ११ वाजता कठोरा मार्गालगतच्या पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम हाॅलमध्ये होणार आहे.

अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत साेहळा २४ जून रोजी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा २४ जून रोजी सकाळी ११ वाजता कठोरा मार्गालगतच्या पी.आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम हाॅलमध्ये होणार आहे.
या साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर हे राहतील. या साेहळ्यात सुमारे ४६ हजार विद्यार्थ्यांना गौरविले जाणार आहे. यात गुणवंतांना सुवर्ण, कास्यपदकासह पदवीने सन्मानित केले जाणार आहे. या साेहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रभारी परीक्षा संचालक मोनाली तोटे यांनी केले.