शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

३६८ पुरूष ठरले कौटुंबिक अत्याचाराचे बळी

By admin | Updated: January 24, 2016 00:16 IST

समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे.

नवरोबा बेपत्ता : पुरूषांसाठीही राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याची मागणी मोहन राऊ त धामणगाव रेल्वे समाजात सर्वाधिक अन्याय महिलांवर होतो़ ही सूर्यप्रकाशाएवढी सत्य बाब असली तरी तालुक्यात मागील पाच वर्षांत ३६८ पुरूष कौटुंबिक हिंसेचे बळी पडले असल्याची धक्कादायक महिती पुढे आली आहे. कुटुंबात पती-पत्नी ही संसाराची दोन चाके होत. गाडा हाकत असताना भविष्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. दरम्यान, मोठी कसरत करावी लागते़ सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मुलगा तथा मुलगी लहान असताना मुलांना इंजिनिअर, डॉक्टर करणे तसेच मोठ्या हुद्यावर नोकरी लागण्याचे स्वप्न पाहतात़ यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची या जन्मदात्यांची तयारी असते़ परंतु वाढत्या महागाईत जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही स्वप्ने अर्ध्यावर तुटतात़ अशातच विविध कारणांवरून पती-पत्नीत वाद निर्माण होतात. यासोबतच एकमेकांविषयी द्वेष उत्पन्न झाल्याने पत्नी किंवा पती आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला जातो़ यात महिलांची संख्या अधिक प्रमाणात असली तरी पुरूष झालेल्या तक्रारीवरून बळी पडतो़ धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, दत्तापूर या पोलीस ठाण्यासह तालुक्यातील काही गावांची हद्द चांदूररेल्वे व कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते़ मिळालेल्या पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीवरून पती-पत्नीत वाद झाल्याने अनेक तक्रारीत पतीवर गुन्हा दाखल करण्याचे प्रकार मागील पाच वर्षांत घडले आहे़ पती घरी नसताना पत्नीने जाळून तथा विष घेऊन आत्महत्या केली असली तरी संब्ांधित पुरूषाविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे आकडेवारीवरून पहावयास मिळत आहे़ मागील पाच वर्षांत कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्यामुळे ३६८ पुरूष या कौटुंबिक हिंसेचे बळी पडले आहे़ दररोज कौटुंबिक वाढता कलह पाहता ३४ नवरोबा कुटुंब सोडून गेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ महिलांची आत्महत्या ही कुटुंब कलहातून झाली असल्याने संबंधित पती हा कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल होणे ही स्वाभाविक बाब आहे़ परंतु अशा कारणाची चौकशी होणे महत्त्वाचे असल्याचे या प्रकरणाला बळी पडलेल्या पुरूषांची मागणी आहे़ पुरुषांसाठी आयोग स्थापन करा मागील अनेक वर्षांपासून महिलांवर अत्याचार होत असल्याने शासनाने कठोर कायदा अस्तित्वात आणला़ त्यामुळे महिलांना संरक्षण मिळाले़ आजही महिलांची छळवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येतात़ परंतु या सर्व बाबींना संबंधित पुरूष किती जबाबदार आहे़, या बाबीची कारणमीमांसा शोधणे गरजेचे आहे. पुरूषांसाठी हे राष्ट्रीय आयोग स्थापन करावे, अशी मागणी जोर धरत आहे़