दोन महिन्यात ३६५८ रॅपिड अँटिजेन चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:01 IST2020-08-23T05:00:00+5:302020-08-23T05:01:01+5:30
शहरासोबतच ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये जिल्हाभरातील कोणताच तालुका निरंक राहिलेला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आरोग्य विभागाकडून सर्वच तालुक्यांच्या मुख्यालयी रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्र आणि फोल्डिंग केबीनव्दारे रुग्ण आढळलेल्या गावातही चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दोन महिन्यात ३६५८ रॅपिड अँटिजेन चाचण्या
अमरावती : जिल्हा आरोग्य विभागामार्फत २० जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात ३ हजार ९६२ रॅपिड अँटिजेन किटव्दारे ३ हजार ६५८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्यात. यामध्ये १९७ नागरिकांना बाधा झाल्याचे आढळून आले, तर ३ हजार ४६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शहरासोबतच ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामध्ये जिल्हाभरातील कोणताच तालुका निरंक राहिलेला नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, आरोग्य विभागाकडून सर्वच तालुक्यांच्या मुख्यालयी रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्र आणि फोल्डिंग केबीनव्दारे रुग्ण आढळलेल्या गावातही चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २० ते २१ ऑगस्टपर्यंत १४ तालुक्यांत रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी ३ हजार ६९२ किट उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या किटव्दारे ३ हजार ९५८ नागरिकांची चाचणी घेण्यात आली आहे. त्यात १९७ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ३ हजार ४६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शना विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.