शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

३६५ दिवसांत ३६० डिग्रीने अर्थव्यवस्थेला वळण, माधव भंडारी यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 21:03 IST

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे.

अमरावती : नोटाबंदीच्या फटक्याने देशविरोधी अनेक मुद्दे निकाली निघाल्याने विरोधकांचा तीळपापड झाला आहे. भाजपा सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून हटविल्या. त्याला बुधवारी वर्ष पूर्ण झाले. त्याप्रीत्यर्थ काळा पैसाविरोधी दिवस आम्ही पाळत आहे. त्यानंतरच्या ३६५ दिवसांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ३६० अंशातून सुधारित वळण मिळाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी यांनी येथे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा हटविण्याचा निर्णय देशाला धक्का देऊन गेला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही काळ परिणाम होऊन जनतेला त्रास सहन करावा लागला. मात्र, देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवादाचा कहर यांच्यावर अंकुश घालण्यास मदत झाली. आयकराचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला. करदात्यांची संख्या वाढली. देशाच्या तिजोरीत कधी नव्हे एवढा पैसा जमा झाला. आता सर्व स्तरांतून देशाची आर्थिक घडी सुधारत असल्याचे माधव भंडारी म्हणाले. पत्र परिषदेला शिवराय कुलकर्णी, प्रणय कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, चेतन गावंडे, बपोरीकर आदी उपस्थित होते.२३.८ टक्के कर वसुलीच्मागील ७० वर्षांच्या काळात देशाला केवळ दोन ते अडीच टक्के आयकर प्राप्त होत होता. ४० टक्क्यांवर लोक कर भरतच नव्हते. मात्र, नोटबंदीमुळे बँकांचे व्यवहार पारदर्शक झाल्याने यंदा १९ लाख नवीन करदाते पुढे आले आहेत. त्यामुळे २३.८ टक्के करवसुली झाली. त्यातून भरमसाठ पैसा सरकारच्या तिजोरीत जमा झाला तसेच बँकेत ठेवीस्वरुपात मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला, असे भंडारी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNote Banनोटाबंदी