३५ हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’
By Admin | Updated: September 14, 2014 23:46 IST2014-09-14T23:46:57+5:302014-09-14T23:46:57+5:30
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३

३५ हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’
गजानन मोहोड ल्ल अमरावती
जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३४ हजार ९६० हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’ राहिले आहे. दीड महिना उशिरा आलेला पाऊस, निकृष्ट बियाणे, दुबार व तिबार पेरणीचे संकट यामुळे हे क्षेत्र नापेर राहिल्याने शेतकऱ्यावर हे आरिष्ट्य ओढवले आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे खरिपाच्या पेरणीला सुरूवात होते. २५ जूनच्या आसपास पेरणी आटोपली असते. यंदा पावसाने दडी मारली, दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली नंतर पुन्हा पाऊस खंडीत झाला. परिणामी पेरणी रखडल्या. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्याचे धाडस केले त्या शेतामधील बिजांकूर र करपले व बियाणे दडपल्यामुळेही पिकाला मोड आली. निकृष्ट बियाण्यामुळेही बिजांकुरण झाले नाही. पेरणीला आधीच झालेला उशीर व अश्या स्थितीत पिकाला मोड आल्यामुळे हे क्षेत्र नापेर राहिले आहे. पावसाने दडी मारली मात्र आलेल्या पावसात पाच वेळा अतिवृष्टी झाली.