शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:16 IST

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा पावसाळ्याचे दोन महिन्यानंतरही ४९ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विभागातील अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील ३५ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती गंभीर असूून, भर पावसाळ्यात ४९ टँंकरने ४८ गावांना पाणीपुरवठा होत आहे. विभागातील ४९९ जलप्रकल्पांत केवळ ४० टक्के साठा आहे. यामध्ये १० टक्के मृतसाठा गृहीत धरल्यास आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.अमरावती विभागात १ जून ते १ आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत पावसाची सरासरी ४२९.५ मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३९३ मिमी पाऊस पडला. ही ९१.५ टक्केवारी आहे. मागील वर्षी याच तारखेला २८९ मिमी पावसाची नोंद होती. सलग चार वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याने भूजलस्तर मोठ्या प्रमाणावर खालावला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात आज तारखेपर्यंत २८९.४ मिमी पाऊस झाला. ही ९१ टक्केवारी आहे. अकोला जिल्ह्यात २९१.९ मिमी पाऊस झाला. ही १२२.८ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३२८.९ मिमी पावासाची नोंद झाली. ही ९६ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ३२९ मिमी पाऊस झाला. ही ७२ टक्केवारी आहे, तर वाशिम जिल्ह्यात ३७५ मिमी पाऊस झाला. ही १३० टक्केवारी आहे. विभागात सर्वात कमी पाऊस बुलडाणा जिल्ह्यात झाल्यामुळे अद्यापही ४८ गावांमध्ये ४९ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे वास्तव आहे.सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यातील ११ तालुके, अकोला २, यवतमाळ ९ तर बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच १३ ही तालुके पावसात माघारली आहेत. पावसाचे आता ५९ दिवस बाकी आहेत व हवामानतज्ञांच्या माहितीनुसार आॅगस्टच्या ८ ते १० तारखेपर्यंत अशीच स्थिती कायम राहणार असल्यामुळे आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

४९९ प्रकल्पांत ४० टक्केच साठाविभागात एकूण ४९९ जलप्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४०.११ टक्के साठा आहे. त्यातही १० टक्के 'डेडवॉटर' असल्याने प्रत्यक्ष ३० टक्केच साठा असल्याचे वास्तव आहे.  बुलडाणा जिल्ह्यात पेनटाकळी प्रकल्पात ४.८७ टक्के, नळगंगा १०.१६, ज्ञानगंगा १६.९२, पलढग, १२.५, मन १५.९४, तोरणा ८.३७, तोरणा ८.३७ व उतावली प्रकल्पात १७.२३ टक्के साठा आहे.५ आॅगस्टपर्यंत पावसाची उघडीपहवामानतज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात ५ आॅगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. ६ तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनच्या स्थितीत काही प्रमाणात सुधार येऊ शकतो. हवामानाची सक्रिय स्थिती सध्या उत्तर प्रदेशात कार्यरत आहे, तर मान्सूनचा अक्ष उत्तर भारतात सक्रिय आहे.

टॅग्स :Waterपाणी