राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी
By Admin | Updated: June 23, 2015 01:03 IST2015-06-23T01:03:33+5:302015-06-23T01:03:33+5:30
घरकुलाचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे ...

राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी
अमरावती : घरकुलाचे स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या राणा लॅन्डमार्क विरोधात आणखी ३५ तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्या आहेत. 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे पुन्हा तक्रारीचा ओघ सुरु झाला आहे.
‘राणा लॅन्डमार्क’ने शहरातील २७७ गुंतवणूकदारांची १० कोटीने फसवणूक केली. पोलिसांनी योगेश नारायण राणा, चंद्रशेखर राणा व मॅनेजर शशिकांत निरंजन जिचकारविरूध्द गुन्हे नोंदविले. त्यांना अटक करून १७ कोटी ८६ लाख ४८ हजार ७६६ रुपयांची स्थावर संपत्ती जप्त करून नऊ बँकांच्या खात्यांमधील ५२ हजार ८६६ रुपयांची रोखसुध्दा जप्त केली आहे. प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गृहविभागाकडे पाठविला आहे. याप्रकरणासंदर्भात तक्रारी असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन 'लोकमत'ने वृत्तातून केले होते. त्यामुळे तब्बल आणखी ३५ तक्रारी गुन्हे शाखेला प्राप्त झाल्याची माहिती पीआय गणेश अणे यांनी दिली.