तालुक्यात कृषीचे ३५ कोटी वीज बिल थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:38+5:302021-02-23T04:19:38+5:30

चांदूर रेल्वे : तालुक्यातील एकूण ७ हजार १३४ कृषिपंपधारक शेतक०यांकडे सप्टेंबर २०२० पर्यंतचे तब्बल ३५ कोटी २३ लाख रुपये ...

35 crore electricity bill of agriculture in the taluka | तालुक्यात कृषीचे ३५ कोटी वीज बिल थकीत

तालुक्यात कृषीचे ३५ कोटी वीज बिल थकीत

चांदूर रेल्वे : तालुक्यातील एकूण ७ हजार १३४ कृषिपंपधारक शेतक०यांकडे सप्टेंबर २०२० पर्यंतचे तब्बल ३५ कोटी २३ लाख रुपये वीज बिल थकीत आहे. याशिवाय तालुक्यातील एकूण १६ हजार २४४ घरगुती ग्राहकांकडे ९ कोटी २४ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याची माहिती आहे.

कोरोनाकाळात वीज बिल भरण्याचा आग्रह न केल्याने तालुक्यातील शेतकºयांकडे थकबाकी आहे. बिलाची रक्कम वाढल्याने अनेक शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यांची वीज जोडणी अद्याप कापली गेली नसली तरी त्यांनी लवकरात लवकर वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाच्यावतीने थकबाकीदार शेतकºयांना एकूण वीज बिलात ६५ टक्के सवलत देण्यात येत आहे. शेतकºयांनी वीज बिलातील अर्धी रक्कम भरली तरी अर्धी रक्कम माफ होणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता सागर नाईक यांनी सांगितले. घरगुती वीज ग्राहकांना मात्र बिलात कुठलीही सवलत नसल्याचे त्यांनी सांगितले. बिलाचे टप्पे पाडून वीज कापणीची गैरसोय टाळावी, असेही विद्युत अधिकाºयांनी सांगितले. मार्चपर्यंत सर्वच वीज बिल वसुलीचे टार्गेट असून, त्यानंतर मात्र वीजपुरवठा कापण्याची कारवाई होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय ३६० वाणिज्यिक वापराच्या मीटरसाठी ४१ लाख ५६ हजार, तर औद्योगिक वापरासाठी ६५ ग्राहकांकडे १० लक्ष ६० हजार रुपये वीज बिल थकीत होते. त्यातील जवळपास रक्कम वसूल करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

Web Title: 35 crore electricity bill of agriculture in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.