केंद्रीय मार्ग निधीतून जिल्ह्यात ३४३ कोटींची कामे
By Admin | Updated: September 5, 2016 00:21 IST2016-09-05T00:21:10+5:302016-09-05T00:21:10+5:30
अमरावती शहरातील उड्डाणपुलासह काँग्रटीकरणाचे रस्ते व डांबरीकरणाचे कामे करण्यात येत असून...

केंद्रीय मार्ग निधीतून जिल्ह्यात ३४३ कोटींची कामे
११ कामांना मंजुरी : केवळ दोन कोटींची तरतूद
अमरावती : अमरावती शहरातील उड्डाणपुलासह काँग्रटीकरणाचे रस्ते व डांबरीकरणाचे कामे करण्यात येत असून याकरिता केंद्रीय मार्ग निधीतून ३४३ कोटींची विकासात्मक कामाना मंजुरी मिळाली आहे. मंजूर ११ कामांपैकी एकही काम सहस्थिीतीत सुरू झालेले नाही. शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २ कोटींची तरतूद करून दिलेली आहे.
अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाने दिलेल्या महितीनुसार रेल्वे स्टेशन ते चांदूररेल्वे रस्ता, अकोट- अंजनगाव - परतवाडा रस्त्याची सुधारणा, भोकरबर्डी- धारणी रस्त्याची सुधारणा, अमरावती शहरातील मालवीय चौक ते नागपुरी गेटपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पंचवटी ते नवाथे रस्त्याची सुधारणा, रेल्वे स्टेशन ते बसस्टॅड ते चपराशीपुरा पर्यंतच्या रस्त्याचे काँग्रेटीकरण, चित्रा चौक- ते इस्माईल कटपीस जवळील रस्ता, अमरावती- बडनेरा रस्त्यावरील मध्यरेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम, वरुड ते हातूर्णा आष्टी रस्त्याचे रुदीकरण व डांबरीकरण, तसेच रेल्वे स्टेशन ते ईर्वीन चौक रस्त्याची सुधारणा, अकोट - अंजनगाव रस्त्याचे रुदीकरण व डांबरीकरण, कठोरा नाका ते कठोरा गावापर्यंत रस्त्याचे सौदर्यीकरणाचे व अंजनसिंगी - मंगरुळ पुलगाव रस्त्याची सुधारणा आदी विकासात्मक कामांना केंद्रीय मार्ग विकास निधीतून मंजूरात मिळाली आहे. बजेट मध्ये या कामांकरीता तरतूद केली आहे. पण आतापर्यंत या कामांकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाल फक्त दोन कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच या कामांचे लवकरच या कामांकरिता ई-टेंडरींग करण्यात येणार आहे. केंद्राचा ऐवढा मोठा निधी मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत. (प्रतिनिधी)
शासनाने मागच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील अकरा कामांकरिता ३४३ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. पण आतापर्यंत २ कोटींची तरतूद झाली असून लवकरच निधी मिळणार आहे.
- विजय बनगिनवार,
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती