शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना विषबाधा; अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: September 17, 2022 14:47 IST

शुक्रवारी रात्रीपासून हे विद्यार्थी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत आहेत.

अमरावती : परतवाडालगतच्या कारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील ३४ मुलींना शुक्रवारी सायंकाळी विषबाधा झाली. ही विषबाधा नेमकी कशातून झाली याची अजूनपर्यंत स्पष्टता झालेली नाही.

या बाधित ३४ मुलींना शिक्षकांनी औषधोपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्रीला दाखल केले.डॉक्टरांनी यातील ३० मुलींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, एका मुलीला उपचारार्थ अमरावतीला पाठविले. तर चार मुलींना औषधोपचारानंतर लागलीच सुट्टी देण्यात आली.

या सर्व बाधित मुलींना उलटी, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास शुक्रवारला सायंकाळी जेवणानंतर जाणवायला लागला. सध्या या सर्व मुलींचे प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दरम्यान यातील आठ मुलींना शनिवारला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

पंचशील आदिवासी आश्रमशाळेत वर्ग एक ते वर्ग बारा पर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला मुलींनी शुक्रवारला सायंकाळी सोबतच जेवण घेतले. यात मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही. दरम्यान सायंकाळी वर्ग एक ते बारा मधील निवडक अशा ३४ विद्यार्थिनींनाच हा त्रास जाणवला. त्यामुळे नेमकी ही विषबाधा कशातून झाली याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

अतिरिक्त वार्ड सज्ज 

औषधोपचार करिता दाखल बाधित मुलींचे एका स्वतंत्र वार्डात व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान बाधित विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास येणाऱ्या विद्यार्थ्याला योग्य तो औषधोपचार तात्काळ मिळावा म्हणून एक अन्य वार्ड अतिरिक्त बेडसह सज्ज ठेवण्यात आला असल्याची माहिती अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी सांगितले. विषबाधेचे नेमके कारण सध्या सांगता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक रुग्णालयात 

पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील बाधित विद्यार्थीनींच्याआरोग्याबाबत शाळेतील शिक्षकही काळजी घेत आहेत. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावती जिल्हा रुग्णालयात वस्तीगृह अधीक्षकेसह शाळेतील शिक्षक रुग्णालयात उपस्थित आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थीAmravatiअमरावतीfood poisoningअन्नातून विषबाधा