शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

३३०० शेतकरी प्रतीक्षा यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:04 IST

नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील ३,५७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी दहा दिवसांत १०७ शेतकऱ्यांची १,४८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत दोन शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी संदेश पाठवविले. ३,३०० शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. ती खरेदी केव्हा होईल, याबाबत खविसंघ व शेतकरी साशंक आहेत.

ठळक मुद्देनाफेडद्वारे १४८३ क्विंटल तूर खरेदी : नांदगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील ३,५७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी दहा दिवसांत १०७ शेतकऱ्यांची १,४८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत दोन शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी संदेश पाठवविले. ३,३०० शेतकरी तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. ती खरेदी केव्हा होईल, याबाबत खविसंघ व शेतकरी साशंक आहेत.नाफेडच्या खरेदी केंद्रावर तुरीला प्रतिक्विंटल ५,६७५ रुपये भाव आहे. तर खासगी बाजारात त्याच तुरीचे मोल ४७०० ते पाच हजारांच्या आसपास आहे. मात्र नाफेडकडे विकलेल्या तुरीचा आर्थिक मोबदला वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्यांच्याकडील तूर नाईलाजाने खासगी व्यापाºयांना विकत आहेत. शेतकºयांना मुला-मुलींचे लग्न, शिक्षण, शेती मशागती व इतर व्यवहारासाठी नगदी रकमेची गरज असल्याने शेतकºयांची ससेहोलपट होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज अडीचशे ते तीनशे पोती तूर विक्रीसाठी येत आहे.नाफेड तूर खरेदीमध्ये ग्रेडिंग केले जाते. त्यात तुरीतील ओलावा, तुरीचा दर्जा तपासला जातो. नंतर तुरीला चाळणी मारली जाते. नाफेड तूर खरेदीसाठी एका लहान शेडमध्ये केवळ दोन मोजमाप काटे आहे. चाळणीखाली निघालेली तूर शेतकऱ्यांना घरी परत न्यावी लागते. दुसरीकडे आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांची संख्या व प्रत्यक्षात तूर खरेदी केलेल्यांच्या संख्येत तफावत असल्याने खरेदी आणि आर्थिक मोबदला मिळेल तरी केव्हा, असा प्रश्न नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकºयांना पडला आहे.मोर्शी-वरुडमध्ये तूर खरेदी रखडलीमोर्शी/ वरुड : तूर खरेदीतील कासवगती आता शेतकऱ्यांसाठी संताप आणणारी ठरली आहे. मोर्शी आणि वरुड तालुक्यातील २८२१ शेतकऱ्यांची तूर खरेदीविना पडून असल्याने मोबदला मिळेल तरी कधी, असा शेतकºयांचा प्रश्न आहे. मोर्शी तालुक्यात आॅनलाईन नोंदणी केलेल्या २४२२ पैकी ४६० शेतकऱ्यांची ५९७२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वरुडमध्ये १३१४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. केवळ ४५५ शेतकऱ्यांची ५०१९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वरुडमध्ये शेतकºयांच्या नावावर व्यापारीच उखळ पांढरे करुन घेत असल्याची ओरड आहे. त्यातच तलाठ्यांनी संप पुकारल्याने आॅनलाईन सातबारा तर सोडा, हस्तलिखित देण्यासाठी तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची परवड होत आहे.नाफेड तूर खरेदीसाठी आवश्यक आॅनलाईन नोंदणी क्रमांक २५९८ असा आहे. खरेदी कासवगतीने खरेदी सुरू असल्याने तुरीचे मोजमाप कधी होईल माहित नाही. प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नाही.- वसंतराव कडू, शेतकरी, येनसतूर खरेदीसाठी बाजार समितीत आॅनलाईन नोंदणी केली. तो क्रमांक २४८१ असा आहे. तूर्तास केवळ ९५ शेतकऱ्यांच्या तुरीचे माप झाले. आमचा क्रमांक केव्हा लागणार?- फिरोज खान अहमद खानशेतकरी, नांदगाव खंडेश्वर