शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा बिगुल वाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 17:37 IST

राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे.

- गणेश वासनिक 

अमरावती - राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. यात वनविभागाचा सिंहाचा वाटा असणार, तर अन्य यंत्रणेला नवीन जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.राज्यात लोकसंख्येच्या तलनेत वनक्षेत्र केवळ १८ टक्के असल्याने जंगलाचे प्रमाण ३३ टक्क्यांवर नेण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्षलागवडीची चळवळ लोकाभिमुख केली आहे. सन २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीनंतर ४ कोटी व १३ कोटीनंतर चौथा टप्प्यात न भुतो न भविष्यती ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राज्याच्या विविध विभागांना करावी लागणार आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट हे सहज शक्य नसल्यामुळे आतापासून वनविभागाने अ‍ॅक्शन प्लॅनची तयारी चालविली आहे. महसूल व वनविभागाने ६ सप्टेंबर २०१८ रोजी यासंदर्भात आदेश निर्गमित करून मुख्य सचिवांपासून तर  नगरपंचायतींच्या मुख्याधिकाºयांना या चळवळीत कोणतीही उणिवा राहू नये, याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. वृक्षलागवडीचे टार्गेट जिल्हाधिकाºयांना पूर्ण करावयाचे आहे. मात्र, ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या यशस्वीतेसाठी तूर्तास महसूल विभाग चक्रावून गेला आहे. वृक्षलागवडीची संपूर्ण जबाबदारी प्रथम श्रेणी अधिकाºयांच्या खांद्यावर सोपविली जाणार आहे. ३३ कोटी वृक्षलागवडीचे टार्गेट पूर्ण न झाल्यास याच अधिकाºयांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

वन यंत्रणेला सर्वाधिक टार्गेटसन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्षलावगडीचे उद्दिष्ट आहे. वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि वनविकास महामंडळ असे १८.७५ कोटी वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार केला आहे. रेल्वे आणि वन विभागाकडे सर्वाधिक जागा असल्याने वन विभाग ७.२९ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट पार पाडले. मात्र, सामाजिक वनीकरणला शेतकºयांच्या बांधावर ७.२९ कोटी वृक्षलागवड केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

इतर यंत्रणा चक्रावली३३ कोटी वृक्ष लागवडीत ग्राम पंचायतींना ८ कोटी तर इतर शासकीय विभागांना ६.२५ कोटी वृक्ष लावगड करण्याचे उद्दिष्ट आहे. ग्राम पंचायतींची ई-क्लास जमिनी अतिक्रमीत होऊन त्या ठिकाणी घरे तयार झाली आहे. परिणामी ग्रामपंचायतींना ८ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट कसे पूर्ण करावे हा प्रश्न निर्माण होणार आहे. अन्य विभागाने ६.२५ कोटी वृक्ष लागवड कोठे करावी, हा गंभीर प्रश्न आहे.

राज्याच्या वृक्ष लागवड मोहिमेने देशात नाव गौरविले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्र हरितमय करण्यासाठी येत्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम राबविली जाणार असून, त्याकरिता आतापासून सुक्ष्म नियोजन केले जात आहे.- सुधीर मुनगंटीवार,अर्थ व वनमंत्री, महाराष्ट्र

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारforestजंगलforest departmentवनविभाग