शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ जलशुद्धिकरण केंद्र

By गणेश वासनिक | Updated: June 20, 2023 14:25 IST

गोड्या पाण्याच्या वापरात ६.३ टक्के झाली कपात; रेल्वे ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसण्यासाठी पाण्याचा वापर

अमरावती : मध्य रेल्वेने सांडपाणी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३२ हून अधिक जलशुद्धीकरण संयंत्रे उभारली आहे. यात दररोज एक कोटी लिटरपेक्षा जास्त पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे वाढत्या जलसंकटावर शाश्वत उपाय म्हणून हे केंद्र उपयाेगी ठरत आहेत. तसेच प्रदूषित पाण्याचा पर्यावरणातील विसर्ग दूर करते. हे प्रक्रिया केलेले पाणी नंतर ट्रॅक धुणे, स्टेशनचे मजले पुसणे यासह स्वच्छतेसाठी वापरले जाते.

मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. जलसंधारणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरचा पाण्याचा पुर्नवापर हा पिण्यायोग्य कारणांसाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी केला जात नाही, ही बाब रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

मध्य रेल्वेत सन २०२२ मध्ये १५७५ किलोलिटर प्रतिदिन केएलडी पाणी तयार करण्याच्या क्षमतेसह १० नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जलसंधारणाच्या या व्यापक उपाययोजनांमुळे मध्य रेल्वेने ताज्या पाण्याच्या वापरामध्ये ६.३ टक्क्याची ची घट नोंदवली आहे. संपूर्ण झोनमधील प्रमुख उपभोग केंद्रांवर जल लेखापरीक्षण आणि बचत प्रक्षेपणांद्वारे जलसंपत्तीचे संरक्षण करण्यात पुढे असल्याचे भुसावळ येथील रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

येथे बसविण्यात आले जलशुद्धिकरण केंद्र• लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी १२० केएलडी क्षमतेचे २ वॉटर रिसायकलिंग प्लांट• अहमदनगर येथे ५० केएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र• नाशिक रोड येथे २०० केएलडी क्षमतेचे केंद्र• अकोला येथे ५०० केएलडी क्षमता• खांडवा येथे ५०० केएलडी क्षमता• कोपरगाव येथे १५ केएलडी क्षमता• सोलापूर येथे १५ केएलडी क्षमता• अजनी, नागपूर येथे ४० केएलडी क्षमता• साईनगर शिर्डी येथे १५ केएलडी क्षमतेचा प्रकल्प

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेWaterपाणी