३२ टक्के पॉझिटिव्हिटी धोक्याच्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:16+5:302021-05-07T04:13:16+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. मात्र, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतेच असल्याचे ...

32% positivity at risk | ३२ टक्के पॉझिटिव्हिटी धोक्याच्या वळणावर

३२ टक्के पॉझिटिव्हिटी धोक्याच्या वळणावर

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना चाचण्यांमध्ये कमी आलेली आहे. मात्र, यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढतेच असल्याचे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दहा दिवसांत सरासरी २६ टक्क्यांवर व बुधवारी ३२ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांद्वारा कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रमाण जास्त होते. माार्चअखेरीस शहरातील प्रमाण कमी होऊन ग्रामीणमधील रुग्णसंख्या वाढायला लागली. ग्रामीणमधील वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव तालुके आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाने ११० गावे सील करण्यात आलेली आहेत.

यामध्ये चिखलदरा तालुक्यात चुर्णी, डोमा, काटकुंभ, खंडूखेडा, चिखली, सेमाडोह, चिखलदरा व हतरू ही गावे कंटेन्मेंट झोन करण्यात आलेली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोखड, गौरखेडा, तिवसा तालुक्यात वणी, सातरगाव, वाठोडा, कुऱ्हा, मोझरी, गुरुदेवनगर व सुरवाडी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात चिंचोना, चौसाळा, विहिगाव, कारला व कुंभारगाव, भातकुली तालुक्यात कवठा बहाळे, जावरा, कानफोडी व भातकुली तसेच दर्यापूर तालुक्यात चंडिकापूर व दर्यापूर येथील शिवाजीनगर व साईनगर कंटेन्मेट आहेत.

चांदूरबाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव, करजगाव व प्रल्हादपूर, चांदूर् रेल्वे तालुक्यात मुंडगाव, सातेफळ, बागापूर, कळमगाव व कळमजापूर, अमरावती तालुक्यात वलगाव, अंजनगाव बारी, नांदगाव पेठ, गजानन टाऊनशीप, प्रिंप्री यादगिरे व डवरगाव तसेच धामणगाव तालुक्यात हिरपूर, चिंचोली, सोनगाव खर्डा, आजनगाव, पांडे लेआऊट, जुना धामणगाव, कळासी, देवगाव अंजनवती व सुलतानपूर कंटेन्मेंट आहेत.

बॉक्स

अचलपूर, वरूड तालुक्यांत २१ गावे कंटेनमेंट

अचलपूर तालुक्यात कांडली, देवमाळी, नारायणपूर, आरेगाव, गौरखेडा, कुंभी, रविनगर कुंभी, सावळी धतुरा, हनवतखेडा, तसेच वरूड तालुक्यात टेंभूरखेडा, जरूड, वाठोडा, शेंदूरजना घाट, पुसला, राजुरा बाजार, बेनोडा, लोणी, आमनेर, सुरळी, आामडापूर व ढगा या गावांत कंटेन्मेंट झोन तयार करण्यात करण्यात आलेले आहे.

बॉक्स

मोर्शी, धारणी तालुक्यात २९ गावे हॉटस्पॉट

मोर्शी तालुक्यात चिखलसावंगी खानापूर, पिंपळखूटा, आष्टगाव, दहसूर, हिवरखेड, पार्डी, मायवाडी, पाला, दापोरी, डोंगरयावली, खॅपडा, रिद्धपूर, खेड, तरोडा, नेरिपंगळाई, शिरुर व दाभेरी तसेच धारणी तालुक्यात हरिसाल, साद्राबाडी, बिबामल, कुसुमकोट, झिल्पी, रोणेगाव, सावलीखेडा, बेडाबू, चार्कदा, दिया, हरिहरनगर आदी गावे कंटेन्मेंट आहेत.

पाईंटर

मे महिन्यातील पॉझिटिव्हिटी (टक्के)

दिनांक चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी

१ मे ३६९३ ९८० २६.५३

२ मे ३,६०९ ८०४ २२.२७

३ मे ३,४०४ ९०३ २६.५२

४ मे ४०२३ ११२३ २७.९१

५मे ३७०४ ११६७ ३१.५०

६ मे ०००० ००००० ०००००

Web Title: 32% positivity at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.