३० किलो चांदीच्या पालखीतून देवीचे सीमोल्लंघन
By Admin | Updated: October 19, 2015 00:30 IST2015-10-19T00:30:46+5:302015-10-19T00:30:46+5:30
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंबा-एकवीरेच्या सीमोल्लंघनासाठी अंबादेवी संस्थानतर्फे खास ३० किलो चांदीने मढलेली पालखी तयार करण्यात आली आहे.

३० किलो चांदीच्या पालखीतून देवीचे सीमोल्लंघन
दसऱ्याचा मुहूर्त : नेत्रदीपक सोहळा
संदीप मानकर अमरावती
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंबा-एकवीरेच्या सीमोल्लंघनासाठी अंबादेवी संस्थानतर्फे खास ३० किलो चांदीने मढलेली पालखी तयार करण्यात आली आहे. ही पालखी मागील वर्षी तयार करण्यात आली असून दसऱ्याच्या दिवशी दुपारी ४ वाजता दरम्यान अंबा-एकवीरा मातेच्या मूर्तीला गाभाऱ्यातून काढण्यात येते व त्यांच्या पादुका पालखीत ठेवण्यात येतात. नंतर ही पालखी दसरा मैदानात नेली जाते.
अंबादेवी संस्थानचे सचिव खामगाव येथील अग्रवाल बंधूंना एक महिन्यापूर्वीच मानाचे पत्र पाठविण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी गाभाऱ्यातून देवीच्या मूर्ती काढण्याचा मान पिढ्यान्पिढ्या परंपरेनुसार अग्रवाल कुटुंबाला मिळत आहे, अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक सूर्यकांत कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.