३०० गावे एसटीविना!

By Admin | Updated: January 4, 2015 23:04 IST2015-01-04T23:04:28+5:302015-01-04T23:04:28+5:30

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

300 villages STVINA! | ३०० गावे एसटीविना!

३०० गावे एसटीविना!

ग्रामस्थांच्या नशिबी पायपीटच : विद्यार्थ्यांसह वृध्द प्रवाशांचे प्रचंड हाल
अमरावती : महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन ५५ वर्षे झालीत. परंतु गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची अद्यापही अनेक गावांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
बॉम्बे परिवहन महामंडळाचे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात रूपांतर झाले. तेव्हापासून गाव पातळीपर्यंत एसटी बस पोहोचवण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. ज्या ठिकाणी रेल्वे सेवा पोहोचू शकत नाही. त्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी एसटीशिवाय पर्याय नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या आशेने गाव फाट्यावर एसटीच्या प्रतीक्षेत असतात. ५० वर्षांच्या खडतर प्रवासात गाव तेथे एसटी या ब्रिदवाक्याचे तीनतेरा वाजले. तालुक्यांमध्ये १९८१ गावे आहेत. यातील जवळपास २०० गावे अद्याप सार्वजनिक दळणवळणा पासून दूर आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची कसरत
थेट गावात एसटी पोहोचत नसल्याने आबालवृद्धांना दोन ते तीन किलोमिटरची पायपीट करत फाटा गाठावा लागतो. याचा फटका भावी पिढीला बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही किमी अंतर पायी जाऊन शाळा गाठावी लागते. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या भागात एसटीची सेवा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी अनेकदा निवेदने दिली आहेत.
जीव धोक्यात घालून प्रवास
गावात एसटीची सेवा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा उपयोग करावा लागतो. खासगी प्रवासी वाहतूकदारांमध्ये स्पर्धा होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जातात. परिणामी ग्रामस्थांना धोक्याचा सामना करावा लागतो.
बस न पाठविण्याची कारणे
जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत जेथे फाट्यापासून गावाचे अंतर जवळ आहे. नदी किंवा नाले आडवे येतात. तसेच त्या गावांतील रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. काही गावांमधून एसटीला जास्त उत्पन्न मिळत नसल्यामुळे अशा ठिकाणची सेवा बंद करण्यात आलेली आहे.

Web Title: 300 villages STVINA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.