३ आॅक्टोबरनंतर विदर्भात तुरळक पाऊस
By Admin | Updated: September 30, 2015 00:29 IST2015-09-30T00:29:55+5:302015-09-30T00:29:55+5:30
परतीचा मान्सून येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये मध्यभारतातून काढतापाय घेण्याची शक्यता आहे.

३ आॅक्टोबरनंतर विदर्भात तुरळक पाऊस
अमरावती : परतीचा मान्सून येत्या ५ ते ६ दिवसांमध्ये मध्यभारतातून काढतापाय घेण्याची शक्यता आहे. विदर्भात ३ आॅक्टोबरनंतर तुरळक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
यंदा पावसाने सरासरी गाठली आहे. पाऊस समाधानकारक पडल्यामुळे आता नागरिकांना हिवाळ्यातील गुलाबी थंडीची प्रतीक्षा लागली आहे. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. मध्यरात्रीनंतर थंडी जाणवत आहे. सद्यस्थितीत कमाल तापमान ३२ ते ३५ तर कमाल तापमान २० ते २२ डीग्री राहण्याची शक्यता असून सकाळच्या वेळेत ५५ ते ६५ टक्के तर दुपारच्या वेळेत ३० ते ३५ टक्के हवेत आर्द्रता आहे. (प्रतिनिधी)
लवकरच बंगालच्या उपसागरात दक्षिण-पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. सध्या विदर्भात पावसाची शक्यता नाही. मात्र, ३ आॅक्टोबरनंतर तुरळक पाऊस पडू शकतो.
- अनिल बंड, हवामान तज्ज्ञ.