टाकाऊ वस्तंूपासून साकारल्या ‘थ्री-डी’ चिमण्या
By Admin | Updated: March 20, 2015 00:11 IST2015-03-20T00:11:09+5:302015-03-20T00:11:09+5:30
प्रदूषणामुळे पर्यावरणाचे ऱ्हास होऊन चिमणी-पाखरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. २० मार्च या जागतिक चिमणी दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाद्वारा ...

टाकाऊ वस्तंूपासून साकारल्या ‘थ्री-डी’ चिमण्या
लोकमत दिन विशेष
अमरावती : प्रदूषणामुळे पर्यावरणाचे ऱ्हास होऊन चिमणी-पाखरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. २० मार्च या जागतिक चिमणी दिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाद्वारा चिमण्यांना वाचविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तंूपासून रंगबिरंगी आकर्षक थ्री-डी चिमण्यांचा आकार साकारून चिमण्यांना वाचविण्यासाठी अनोखा संदेश दिला आहे.
आधुनिकीकरणामुळे वृक्षांची कत्तल होत असून प्रदूषण वाढत आहे. परिणामी चिमण्या नष्ट होऊ लागल्या आहेत. चिमण्यांचा होणारा ऱ्हास आटोक्यात आणण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होत आहेत.