शहरातील २९० नागरिक अद्यापही बेपत्ता
By Admin | Updated: July 8, 2015 00:20 IST2015-07-08T00:20:13+5:302015-07-08T00:20:13+5:30
शहर पोलीस आयुक्तालयामार्फत २९ जून ते ४ जुलै दरम्यान राबविलेल्या शोधमोहिमेत बेपत्ता असलेले ८२ नागरिक ...

शहरातील २९० नागरिक अद्यापही बेपत्ता
८२ नागरिक घरी परतले : पोलिसांची शोधमोहीम सुरु
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयामार्फत २९ जून ते ४ जुलै दरम्यान राबविलेल्या शोधमोहिमेत बेपत्ता असलेले ८२ नागरिक घरी परतल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. गेल्या सहा वर्षांत ३७२ नागरिक बेपत्ता झाले असून त्यापैकी अजूनही २९० नागरिक बेपत्ता आहेत. त्याची शोधमोहीम पोलीस विभागाकडून सुरु आहे.
मागील सहा वर्षांत शहरातील ३७२ नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सहा वर्षांपासून बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य सुरु आहे. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या आदेशाने २९ जुलै ते ४ जुलैपर्यंत शहरातील दहा पोलीस ठाण्यांतर्गत शोधमोहीम सुरु ठेवली होती. त्यामध्ये बेपत्ता नागरिकांच्या घरी जाऊन पोलीस विभाग चौकशी करीत होते. चौकशीअंती आतापर्यंत ८२ नागरिक घरी परतल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही २९० नागरिक बेपत्ताच आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पर्सन डेस्क आॅफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात बेपत्ता नागरिकांची शोधमोहीम सुरु आहे. (प्रतिनिधी)
बेपत्ता झालेल्या ३७२ नागरिकांपैकी आतापर्यंत ८२ नागरिक घरी परतल्याचे आढळून आले आहे. २९ जून ते ४ जुलैपर्यंत ही शोधमोहीम राबविण्यात आली आहे. अन्य बेपत्ता नागरिकांचा शोध पोलीस ठाणे स्तरावर सुरु आहे.
- रियाजुद्दीन देशमुख,
पोलीस निरीक्षक,
गुन्हे शाखा.