गहाण प्लॉटची विक्री करून २८ लाखांनी फसवणूक
By Admin | Updated: March 13, 2017 00:05 IST2017-03-13T00:05:04+5:302017-03-13T00:05:04+5:30
गृह फायनान्स कंपनीकडे गहाण प्लॉटची परस्पर विक्री करून २८ लाख ८० हजारांनी फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली.

गहाण प्लॉटची विक्री करून २८ लाखांनी फसवणूक
अमरावती : गृह फायनान्स कंपनीकडे गहाण प्लॉटची परस्पर विक्री करून २८ लाख ८० हजारांनी फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली. राजापेठ पोलिसांनी चार आरोपींविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी प्रवीण हिम्मत औगड व एका महिलेने एका गृह फायनान्स कंपनीकडून २८ लाख ८० हजारांचे गृहकर्ज घेतले होते. त्यासाठी त्यांनी मालमत्ता कंपनीकडे गहाण ठेवली, यामध्ये हमीदार म्हणून आरोपी गजानन बळीराम मालधुरे (रा.कोणार्क कॉलनी) होते. मात्र, आरोपींनी गहाण मालमत्तेची कोणतीही पूर्वसूचना न देता पवन रंजित देशमुख (रा.खोलापूर) यांना विक्री केली.
हाप्रकार फायनान्स कंपनीच्या निदर्शनास येताच कंपनीतर्फे त्रिशूल भागचंद सोमन (२४,रा. रुख्मिणीनगर) यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.