२७ वर्षीय युवकाशी अनैसर्गिक कृत्य
By Admin | Updated: July 27, 2016 23:56 IST2016-07-27T23:56:30+5:302016-07-27T23:56:30+5:30
समवयस्क युवकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. रामकृष्ण उत्तम वसुकार (२६,रा. लोणटेक) असे आरोपीचे नाव आहे.

२७ वर्षीय युवकाशी अनैसर्गिक कृत्य
आरोपी अटक : लोणटेकमधील घटना
अमरावती : समवयस्क युवकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला खोलापुरी गेट पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. रामकृष्ण उत्तम वसुकार (२६,रा. लोणटेक) असे आरोपीचे नाव आहे.
लोणटेक येथील रहिवासी २७ वर्षीय युवक आईसोबत राहतो. तो एका महाविद्यालयात स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी सायंकाळी पीडित युवकाची आई घराबाहेर कामानिमित्त गेली होती. युवक घरी एकटाच होता. याचा फायदा घेऊन रामकृष्ण वसुकार याने त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तरूणाची आई घरी आली असता तिला ही बाब लक्षात आली. रात्रीच खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात तिने तक्रार नोंदविली. खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३७७, ४५२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला बुधवारी सकाळी अटक केली. पीडित, आरोपीची इर्विन रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सानप करीत आहेत. (प्रतिनिधी)
पीडित युवकाचा मानसिक विकास पूर्णत: झाला नाही. त्यामुळे आरोपीने संधी साधून त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.
-अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक, खोलापुरी गेट