‘इर्विन’, ‘डफरीन’चे २७ कोटी अखर्चित
By Admin | Updated: October 19, 2015 00:33 IST2015-10-19T00:33:12+5:302015-10-19T00:33:12+5:30
जिल्हाभरातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय ..

‘इर्विन’, ‘डफरीन’चे २७ कोटी अखर्चित
खासदार, आमदार संतप्त : बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस
लोकमत विशेष
अमरावती : जिल्हाभरातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन)मध्ये मूूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी दोन वर्षांपूर्वी वितरित करण्यात आलेले २७ कोटी रुपये अखर्चित असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे खासदार आनंदराव अडसूळ यांनी बांधकाम विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तर आमदार वीरेंद्र जगताप यांनी संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता सनियंत्रण समितीच्या मंजूर कामांचा आढावा घेण्याबाबत शनिवारी पार पडलेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली आहे. सन २०१२-२०१३ आर्थिक वर्षात इर्विनला ११ कोटी तर डफरीनसाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटला असताना मंजूर निधी खर्च करण्यात आला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.