नोंदणीअभावी २,५०० डॉक्टरांवर संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:58+5:302021-07-27T04:13:58+5:30

अमरावती : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून बीएएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलामुळे जवळपास २५ हजारांवर डॉक्टरांची नोंदणी ...

2,500 doctors in crisis due to lack of registration | नोंदणीअभावी २,५०० डॉक्टरांवर संकटात

नोंदणीअभावी २,५०० डॉक्टरांवर संकटात

अमरावती : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडून बीएएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलामुळे जवळपास २५ हजारांवर डॉक्टरांची नोंदणी संकटात सापडली आहे. या सर्व डॉक्टरांना या कार्यप्रणालीचा फटका बसत असून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने एमसीआयच्या धेारणावर नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी बीएएमएस डॉक्टरांना नोंदणी करण्यासाठी दर पाच वर्षानी केवळ एक अर्ज भरून द्यावयाचा होता. मात्र सध्या नोंदणीच्या प्रक्रियेत अनेक बदल करण्यात आले. त्यापैकी एक महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याची त्यातच दर पाच वर्षानी केवळ एक अर्ज भरून होणारी नोंदणी आता अधिक किचकट केली आहे. परिणामी नूतनीकरण करण्यासाठी सुरुवातीला लागणारी सर्व कागदपत्रे ऑनलाईन सबनिट करावी लागतात .इतकेच काय तर नोंदणीच्या शुल्कात भरमसाठ वाढ करून २ हजार रूपये करण्यात आली. विशेष म्हणजे, एमसीआयकडून २० हजार डॉक्टरांची जुने ओळखपत्र व कायम नोंदणी प्रमाणपत्रसुद्धा जमा करून घेण्यात आले. त्यातच आता ऑनलाइन प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आल्या आहेत. अनेक डॉक्टरांना नोंदणी प्रमाणपत्र स्वतः वेबसाईटवरून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी नोंदणी प्रमाणपत्र सुरक्षा मानक (सिक्युरिटी फीचर्स) चा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे. म्हणजे कुणीही जाणकार व्यक्ती एखाद्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन त्याचा दुरुपयोग करू शकतो. या तांत्रिक अडचणीमुळे जवळपास २५ हजार डॉक्टरांच्या नोंदणी रखडली आहेत.

कोट

नोंदणीची प्रक्रिया पूर्वी अतिशय सुलभ होती. मात्र, आता त्यामध्ये अनेक तांत्रिक चुका होत आहेत. त्याचा फटका डॉक्टरांना बसत आहे. एकदा नोंदणी झाल्यानंतर कायम प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.

डॉ. अनिल बाजारे, सचिव, निमा

Web Title: 2,500 doctors in crisis due to lack of registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.