शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

जमिनीच्या वाढीव मोबदल्यासाठीचा २५ वर्षांचा लढा संपला; विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 7:56 PM

जिल्हाधिकारी कक्षासमोर विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

वाढोणा रामनाथ (अमरावती) : १९९३ साली दोन एकर शेत शासनाने पाझर तलावासाठी संपादित केले. त्याचे अवघे १३ हजार रुपये हाती ठेवले. तेव्हापासून वाढीव मोबदल्यासाठी प्रशासनाविरुद्ध सुरू केलेला लढा मृत्यूने संपला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथील अनिल महादेव चौधरी यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

अनिल चौधरी (४५) यांच्याकडे १४ एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर शेत गावतलावाकरिता प्रशासनाने १९९३ मध्ये ताब्यात घेतले. त्यावेळी जेमतेम १३ हजार रुपये त्यांच्या हातावर ठेवण्यात आले. १९९५ मध्ये अनिल चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाढीव मोबदल्यासाठी अर्ज केला. २५ वर्षांत अनेकदा चकरा घालूनही त्यांच्या अर्जावर विचार झाला नव्हता. दरम्यान, त्यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. 

अलीकडे अनिल चौधरी यांच्या शेतालगत समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. अनिल चौधरी यांच्या विरोधाला न जुमानता या कामावरील ठेकेदाराने त्यांच्या शेतात मुरूम काढण्याकरिता जेसीबीने मोठा खड्डा केला. यानंतरही या शेतातून उत्खनन सुरूच होते. ते बंद करण्यात यावे, ही मागणी घेऊन त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले ते हाती कीटकनाशकाची बॉटल घेऊनच. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे विमनस्क स्थितीत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याच दालनासमोर विष प्राशन केले व अंगावर पेट्रोल ओतले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

पत्नीचीही प्रकृती खालावलीअनिल चौधरी यांच्या मनमिळावू व्यक्तिमत्त्वामुळे गावकऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या मृत्यूबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारी रुग्णवाहिकेने आणण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी गर्दी केली. पत्नी भारती यांचा शोक अनावर झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. अनिल चौधरी यांच्या पश्चात आठ वर्षाचा मुलगा, १४ व सात वर्षाच्या मुली आणि दोन बहिणी आहेत. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग