२५ प्रभाग इतिहासजमा, चार प्रभागांचे नामकरण

By Admin | Updated: October 9, 2016 01:02 IST2016-10-09T01:02:50+5:302016-10-09T01:02:50+5:30

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर...

25 ward history, name of four wings | २५ प्रभाग इतिहासजमा, चार प्रभागांचे नामकरण

२५ प्रभाग इतिहासजमा, चार प्रभागांचे नामकरण

सार्वत्रिक निवडणूक : २२ प्रभागांतून ८७ नगरसेवक
अमरावती : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर २५ प्रभाग इतिहासजमा झाले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ४३ पैकी २२ प्रभागांतून ८७ नगरसेवक निवडून येणार आहेत. ही निवडणूक चार सदस्यीय प्रणालीने होत असल्याने विद्यमान २५ प्रभाग इतिहासजमा झाले आहेत. पीडीएमसी, जोग स्टेडियम, जुनीवस्ती बडनेरा व नवीवस्ती बडनेरा हे प्रभाग नव्याने अस्तित्वात आले आहेत.
७ आॅक्टोबरला टाऊन हॉलमध्ये २२ प्रभागांची रचना आणि आरक्षण सोडत काढण्यात आली. २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागांमध्ये घेण्यात आली होती. आगामी निवडणुकीत २१ प्रभागातून प्रत्येकी ४ आणि एसआरपीएफ या प्रभागातून ३ सदस्य निवडून येतील. सन २०१२ मध्ये स्वतंत्र असलेले विलासनगर व मोरबाग या दोन प्रभागांचा संयुक्त एक प्रभाग झाला आहे. याशिवाय काँग्रेसनगर-फ्रेजरपुरा या जुन्या प्रभागाचे नाव बदलून फ्रेजरपुरा हा स्वतंत्र प्रभाग बनला आहे. गवळीपुरा या जुन्या प्रभागाला नव्या प्रभागरचनेत छायानगर-गवळीपुरा असे करण्यात आले आहे. ४३ प्रभागांचे रुपांतर २२ प्रभागांमध्ये करण्यात आल्याने सर्वच प्रभागांच्या सीमारेषा विस्तारल्या आहेत.
प्रभागाची लोकसंख्या प्रत्येकी २६ हजार ते ३२ हजारांच्या घरात आहे. यात बेनोडा, जुनीवस्ती बडनेरा, छायानगर-गवळीपुरा, अलिमनगर, बेनोडा, जमील कॉलनी, गडगडेश्वर, सुतगिरणी हे प्रभाग लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक मोठे आहेत. याशिवाय चार सदस्यीय प्रभागात जोग स्टेडियम हा सर्वात लहान प्रभाग आहे. २०११ च्या ६,४७,०५७ या लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने २२ प्रभाग करण्यात आले आहेत. ओबीसीसाठी २३, अनुसूचित जातीसाठी १५ आणि अनुसूचित जमातीसाठी ०२ जागा राखीव आहेत.

नव्याने बनलेले प्रभाग
पीडीएमसी, जोग स्टेडियम, जुनीवस्ती बडनेरा, नवी वस्ती बडनेरा.

संयुक्त झालेले प्रभाग
शेगाव-रहाटगाव, विलासनगर- मोरबाग, छायानगर-गवळीपुरा

गुडूप झालेले प्रभाग
तपोवन, संत गाडगेबाबा, रामपुरी कॅम्प, विदर्भ महाविद्यालय, मालटेकडी, वडाळी, चपराशीपुरा, स्वामी विवेकानंद, अंबिकानगर, शारदानगर, गौरक्षण, जवाहर गेट, पठानपुरा, मेहंदिया कॉलनी, रहमतनगर, नवाथे, दस्तुरनगर, किरणनगर, वडरपुरा, नेमाणी गोडावून, अलमासनगर, बारीपुरा, सोमवारबाजार, झिरी, जेवडनगर.

Web Title: 25 ward history, name of four wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.