महापालिकेत २५ हायड्रोलिक आॅटो दाखल

By Admin | Updated: September 19, 2015 00:16 IST2015-09-19T00:16:01+5:302015-09-19T00:16:01+5:30

महानरगरपालिकेत २५ हायड्रोलिक आॅटो दाखल झाले आहेत.

25 Hydraulic Autos Filed In Municipal Corporation | महापालिकेत २५ हायड्रोलिक आॅटो दाखल

महापालिकेत २५ हायड्रोलिक आॅटो दाखल

अमरावती : महानरगरपालिकेत २५ हायड्रोलिक आॅटो दाखल झाले आहेत. महापौर चरणाजितकौर नंदा, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याहस्ते नवीन आॅटोचे पूजन करण्यात आले. उर्वरित आॅटो ८ दिवसांत येणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी यावेळी दिली.
प्रत्येक भागात एक आॅटो देण्यात येत आहे. यामुळे शहरातील कचरा लवकर उचलला जाईल व साफसफाईचा प्रश्न कमी होईल, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. महपौर चरणजितकौर नंदा यांनी प्रत्येक भागात एक आॅटो दिल्यामुळे प्रभागातील कचरा उचलण्याचे क्षमता वाढेल व प्रभागातील रोगराई मोठ्या प्रमाणात कमी होईल. यावेळी गटनेता गुंफाबाई मेश्राम, झोन सभापती मिलिंद बांबल, प्रदीप बाजड, अजय गोंडाणे, दीपक पाटील, नीलिमा काळे, अर्चना इंगोले, अलका सरदार, इमरान अशरफी, अमोल ठाकरे, निर्मला बोरकर, उपायुक्त चंदन पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्यामसुंदर सोनी, अजय जाधव, स्वास्थ निरीक्षक धनंजय शिंदे, प्रल्हाद चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 25 Hydraulic Autos Filed In Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.