वरुड येथे २५ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 00:11 IST2016-07-03T00:11:18+5:302016-07-03T00:11:18+5:30
लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत सखी मंच आणि रक्तदाता संघ वरुडचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

वरुड येथे २५ दात्यांनी केले रक्तदान
वरूड येथे शिबिर : स्व.जवाहरलाल दर्डा यांची जयंती
वरूड : लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत सखी मंच आणि रक्तदाता संघ वरुडचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २५ दात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
'लोकमत'चे संस्थापक स्व.बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय संलग्नित रक्तदाता संघ वरूड आणि लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदाता संघाचेवतीने गोरगरीब व गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करून रुग्णांचे प्राण वाचविण्याचे सामाजिक कार्य दीड वर्र्षापासून सुरू आहे.
शिबिराकरिता लोकमत सखी मंच वरुड विभागप्रमुख रचना सोनारे, तृप्ती मगर्दे, उषा ठाकरे, ममता भंडारी, उज्ज्वला ठाकरे, रोशनी गडलींग, कल्याणी वानखडे, वंदना माकोडे, सीमा उघडे, लोकमत तालुका प्रतिनिधी संजय खासबागे, शहर प्रतिनिधी प्रशांत काळबांडे, रक्तदाता संघाचे संस्थापक तथा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, संघाचे अध्यक्ष जितेंद्र शेटीये, सचिव चरण सोनारे, सुधाकर राउत, सचिन परिहार, राजेश रामटेके आदींनी सहकार्य केले आहे. (तालुका प्रतिनिधी)