२५ कोटी रुपये खर्चून होणार गाडगेबाबांच्या शेंडगावचा विकास

By Admin | Updated: July 21, 2015 00:24 IST2015-07-21T00:24:42+5:302015-07-21T00:24:42+5:30

कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगावचा विकास अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी रखडला होता.

25 crores of rupees will be spent on the development of Gadgabha Shendgaon | २५ कोटी रुपये खर्चून होणार गाडगेबाबांच्या शेंडगावचा विकास

२५ कोटी रुपये खर्चून होणार गाडगेबाबांच्या शेंडगावचा विकास

गाडगेबाबांचे जन्मस्थळ : आमदारांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी
दर्यापूर : कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगावचा विकास अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीअभावी रखडला होता. परंतु आता २५ कोटी रुपये खर्चून शेंडगावचा विकास होणार आहे. या पर्यटनस्थळाची पाहणी आ. रमेश बुंदिले व अधिकाऱ्यांनी नुकतीच केली.
शेंडगावला तीर्थक्षेत्र तसेच पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा यासाठी शासनाचा मानस आहे. तशी मागणी सुध्दा नागरिकांनी केली आहे. यासाठी आ. रमेश बुंदिले यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, अंजनगावचे गटविकास अधिकारी भाष्कर रेंगडे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रोजेक्टच्या अधिकारी क्षिप्रा बोरा, नायब तहसीलदार चव्हाण आदींनी शेंडगावला भेट देऊन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जागेची पाहणी केली व गावकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी आमदार बुंदिले यांना गावातील नागरिक शरद साबळे यांनी कशाप्रकारे विकास करता येईल व कुठल्या कुठल्या ई-क्लासच्या जागा सदर पर्यटन स्थळाकरिता राखीव करता येईल, याबद्दल माहिती दिली. भोलेश्वरी नदीनजीक असलेल्या ६ हेक्टर ४३ आर या ई-क्लास भूखंडाची क्षिप्रा बोरा यांनी पाहणी केली. यावेळी आ. बुंदिले यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या अस्थिकलश मंदिरात श्रीफळ फोडून पूजा केली व पर्यटन स्थळाच्या विकासाकरिता २५ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल व त्यासंदर्भाचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी उपस्थिताना सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत पांडुरंग हुरबडे, मनोहर मुरकुटे, मुरलीधर नाईक तसेच गावच्या सरपंचा व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Web Title: 25 crores of rupees will be spent on the development of Gadgabha Shendgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.