शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी २५ कोटींची तरतूद - राजकुमार बडोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 20:03 IST

दिव्यांग व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी हरित मोबाईल शॉपी योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ३ लाख ७५ हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहे.

अमरावती  - दिव्यांग व्यक्तींना रोजगारक्षम बनविण्यासाठी हरित मोबाईल शॉपी योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना ३ लाख ७५ हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहे. त्याकरिता सामाजिक न्याय विभागाने २५ कोटींच्या निधीची तरतूदही केली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी येथे दिली.अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ना. बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार बच्चू कडू, सत्यशोधक बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू, अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे, प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यावलीकर, सहायक आयुक्त मंगला मून यांच्यासह अपंग स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक न्याय विभागाव्दारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त १२३ अपंग शाळांना मंजुरी दिली. दिव्यांग व्यक्तींची कामे तातडीने सोडविण्यासाठी विभागातील पदांना मंजुरी दिली. सेवानिवृत्त अपंग कर्मचाºयांना निवृत्तीवेतनाचा प्रश्न निकाली काढला. अपंगासाठी राखीव असलेल्या तीन टक्के विकास निधीची मर्यादा वाढवून पाच टक्के करण्यात आली. हा राखीव निधी ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरापर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणांना दिव्यांगांच्या विकासकामावर खर्च करण्यासाठी निर्देशित केला आहे. आ. बच्चू कडू यांच्या मागणीप्रमाणे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेंतर्गत एकाच घरी दोन दिव्यांग असले तरी दोनही दिव्यांगांना समान मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा ना. बडोले यांनी केली. १३ गुणवंत खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांना २० गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांगांना उद्योग उभारणीसाठी एमआयडीसीमध्ये पाच टक्के राखीव भूखंड तसेच कौशल्य विकास योजनेंतर्गत कर्ज वितरण योजना लागू केली आहे. दिव्यांगाना घरकुल मिळावे यासाठी संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावे घरकुल योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांना सादर करण्यात येणार, अशी ग्वाही ना. बडोले यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे, तर आभार नयना कडू यांनी मानले.

स्पर्धेला अडीच तास उशिराने सुरूवातराज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी ३४ जिल्ह्यातून मुला-मुलींनी हजेरी लावली. मात्र, शुक्रवारी १ वाजता आयोजित स्पर्धेचे उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता झाले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासून मैदानावर उपस्थित मुला-मुलींना मान्यवरांची प्रतीक्षा करावी लागली. दिव्यांगाच्या कार्यक्रमातही उशिरा पोहचून मान्यवरांनी लोकप्रतिनिधी असल्याचा परिचय दिला. मात्र यात दिव्यांगाची परवड झाली, हे विशेष.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेMaharashtraमहाराष्ट्र