चार पिकअपमधून २५ बैल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:36 IST2021-01-08T04:36:44+5:302021-01-08T04:36:44+5:30

धारणी पोलिसांची कारवाई, चौघांना अटकधारणी : तालुक्यातील ढाकणा मार्गे अकोटकडे निघालेल्या चार पिकअप वाहनांतून मौजा सावऱ्या नाका येथे धारणी ...

25 bulls seized from four pickups | चार पिकअपमधून २५ बैल जप्त

चार पिकअपमधून २५ बैल जप्त

धारणी पोलिसांची कारवाई, चौघांना अटकधारणी : तालुक्यातील ढाकणा मार्गे अकोटकडे निघालेल्या चार पिकअप वाहनांतून मौजा सावऱ्या नाका येथे धारणी पोलिसांनी २५ बैल जप्त केले. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

धारणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश भोयर यांना ढाकणा मार्गे अकोटकडे पिकअप वाहनातून कत्तलीसाठी बैल नेले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी विशेष पथक गठित करून नाकाबंदी केली. एक वाहन पुढे गेल्यानंतर उर्वरित तीन वाहनांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, ती भरधाव निघाली.

पोलिसांनी पाठलाग करून त्यांना कोहा वनउपज तपासणी नाक्यावर गाठले. येथे एमएच ३० एव्ही ०५३०, एमएच ३० एबी ४१७३, एमएच ०२ सीई ०७५९, एमएच ३१ सीक्यू १४१२ क्रमांकाच्या पिकअपचे चालक व साथीदार नाक्यावर असलेल्या वनमजुरांशी धक्काबुक्की व हुज्जत घालत होते. पोलिसांना पाहताच एमएच ३० एव्ही ०५३० क्रमांकाच्या पिकअपच्या चालकाने त्याचे वाहन वेगाने समोर नेत नाक्यावरील बॅरिगेड तोडले. मात्र, पोलिसांनी चारही वाहने ताब्यात घेतली. त्यामध्ये अडीच लाखांचे २५ बैल निर्दयतेने बांधलेले आढळले. १६ लाखांची वाहने व १० हजारांचे सहा मोबाईलदेखील पोलिसांनी जप्त केले.

अब्दुल आरीफ अब्दुल गफार (३८, रा. अकोट जि. अकोला), फुलेराम छोटेलाल दहीकर (३८, रा. उतावली ता. धारणी), जमीर खान अहमद खान (२३, रा. अकोट, जि. अकोला), सैयद कैसर सैयद अफसर (४५, रा. वाॅर्ड क. १४, नेहरू नगर, धारणी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह तीन पसार झालेले साथीदार व वाहनमालकांविरुद्ध भादंविचे कलम ३५३, २७९, ३४ सह कलम ११ (१) (डी), (ई), (१) प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) (१), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम सुधारीत २०१५ स.क. ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियमासह कलम ११३, १९४ मोटार वाहन कायदा सह कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दुसऱ्या महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई

प्रकरणातील काही वाहने व आरोपींविरुद्ध इसम २९ नोव्हेंबर २०२० रोजी धारणी पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध ही सलग दुसरी कारवाई ठरली आहे.

Web Title: 25 bulls seized from four pickups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.