नोटीस न बजावता २४ सुरक्षा रक्षक कार्यमुक्त

By Admin | Updated: December 2, 2014 22:57 IST2014-12-02T22:57:22+5:302014-12-02T22:57:22+5:30

सुपर स्पेशालीटी रुग्णालयातील २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांना विना नोटीस कार्यमुक्त करण्यात आल्याने मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. आमदार सुनील देशमुखांनी सुपर

24 security guards without assigning notice | नोटीस न बजावता २४ सुरक्षा रक्षक कार्यमुक्त

नोटीस न बजावता २४ सुरक्षा रक्षक कार्यमुक्त

अमरावती : सुपर स्पेशालीटी रुग्णालयातील २४ सुरक्षा कर्मचाऱ्यांना विना नोटीस कार्यमुक्त करण्यात आल्याने मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. आमदार सुनील देशमुखांनी सुपर स्पेशालीटीतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेताना त्यांनी कर्मचारी व प्रशासनात समन्वय घडवून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.
कामगार आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील २४ सुरक्षा रक्षकांना रुग्णालय प्रशासनाने कार्यमुक्त केले. त्यामुळे मंगळवारी सकाळी सुरक्षा रक्षकांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनीही काही वेळ कामबंद करुन रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. यावेळी आमदार देशमुख रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व इमारतीच्या बांधमाची पाहणी करीत होते.

Web Title: 24 security guards without assigning notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.