२४ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:13 PM2019-03-29T23:13:39+5:302019-03-29T23:14:09+5:30

दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात २४ उमेदवार कायम आहेत. यात नऊ पक्षीय, तर १५ अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी १० अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष उमेदवारांच्या गर्दीमुळे ही निवडणूक आता चांगलीच गाजणार आहे.

24 candidates in the fray | २४ उमेदवार रिंगणात

२४ उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देपक्षाचे नऊ, १५ अपक्ष : राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांचा समावेश; १० उमेदवारांची माघार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात २४ उमेदवार कायम आहेत. यात नऊ पक्षीय, तर १५ अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी १० अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष उमेदवारांच्या गर्दीमुळे ही निवडणूक आता चांगलीच गाजणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहे. बहुजन समाज पार्टी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया, बहुजन मुक्ती पार्टी, आंबेडराइट पार्टी आॅफ इंडिया, बहुजन महापार्टी या नऊ पक्षांसह १५ अपक्ष रिंगणात कायम आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया राबविली. त्यानंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. मात्र, एकापेक्षा जास्त अपक्ष उमेदवारांनी पसंती चिन्हाची मागणी केल्यामुळे त्यांना ईश्वरचिठ्ठीद्वारे चिन्हवाटप करण्यात आले. निवडणुकीत एक-दोन नव्हे, तर १५ अपक्ष उमेदवार आहेत. वैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांनी यापूर्वी अनेक निवडणुकीत भाग्य आजमाविल्याने त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरणारी आहे. अपक्ष उमेदवार आपले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत १५ दिवसांत कसे पोहचवितात, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. उमेदवारांची माघार व निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया अमरावती लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
राजदीपने काढली ईश्वरचिठ्ठी
एकापेक्षा जास्त अपक्ष उमेदवारांनी एकाच चिन्हाची मागणी केल्यास अशावेळी ईश्वरचिठ्ठी काढली जाईल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. ‘दूरदर्शन’ हे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी चार उमेदवारांनी मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. राजदीप नामक बालकाने काढलेल्या ईश्वरचिठ्ठीत ‘दूरदर्शन’ हे चिन्ह बहुजन महापार्टीचे उमेदवार संजय आठवले यांना गेले. ही प्रक्रिया ‘इन कॅमेरा’ पार पडली.
सकाळी ११ पासून गर्दी
लोकसभा निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यानंतर चिन्हवाटप होणार असल्याने राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार आणि समर्थकांनी एकच गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असल्याने कोणता उमेदवार माघार घेतो, याकडे अनेकांचा नजरा लागल्या होत्या. याप्रसंगी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. जिल्हा कचेरी परिसरातील गर्दी निवडणूक विभागाने कॅमेºयात कैद केली होती, हे विशेष.
दोन बॅलेट युनिट; २५ व्या क्रमांकावर ‘नोटा’
लोकसभा निवडणुकीत २४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदानासाठी प्रत्येक निवडणूक केंद्रात दोन बॅलेट युनिट राहतील. एका ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांची नावे समाविष्ट करता येतात. यामुळे २४ उमेदवार असल्याने आता दोन बॅलेट युनिटद्वारे मतदान घ्यावे लागेल. २५ व्या क्रमांकावर ‘नोटा’ असेल, अशी माहिती जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. एका बॅलेट युनिटवर १६, तर दुसºया युनिटवर आठ उमेदवारांची नावे असतील.

Web Title: 24 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.