जिल्ह्यात २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

By Admin | Updated: September 25, 2014 23:16 IST2014-09-25T23:16:28+5:302014-09-25T23:16:28+5:30

जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत गुरुवारी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे, अमरावती व अचलपूर मतदारसंघात प्रत्येकी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मोर्शी,

24 candidates filed for the district | जिल्ह्यात २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

जिल्ह्यात २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

अमरावती : जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत गुरुवारी २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धामणगाव रेल्वे, अमरावती व अचलपूर मतदारसंघात प्रत्येकी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मोर्शी, बडनेरा व दर्यापूर मतदारसंघात प्रत्येकी १, तिवस्यातून ३ उमेदवारांनी ६ तर मेळघाट मतदारसंघात ३ उमेदवारांनी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात गुरुवारी पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. यात काँग्रेसतर्फे वीरेंद्र जगताप, भारिप-बमसंच्या नीलम देविदास रंगारकर, आंबेडकर रिपब्लिकन पक्षातर्फे बाळकृष्ण नामदेवराव जाधव तर अपक्ष योगेश उर्फ काका कावडे, पुंडलिक देवीदास मून यांचा समावेश आहे. यापूर्वी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत ६४ इच्छुकांनी ११० उमेदवारी अर्जांची उचल केली आहे.
मेळघाट मतदारसंघात आज गुरुवारी तीन उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले. यात काँग्रेसतर्फे केवलराम काळे, भाजपतर्फे प्रभुदास भिलावेकर तर रजनी बेलसरे यांनी उमेदवारी अर्जांचे दोन संच दाखल केले. एक काँग्रेसतर्फे तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. केवलराम काळे व राजकुमार पटेल या दोघांंनी उमेदवारी अर्जांची उचल केली आहे.
मोर्शी मतदारसंघात गुरुवारी सुनिता धोंडुजी कुमरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. आतापर्यंत एकूण तीन अर्ज दाखल झाले. यात बसपतर्फे ज्ञानेश्वर माधव राऊत व भारतीय दलित काँग्रेसतर्फे कैलास कचरुजी वानखडे यांनी अर्ज दाखल केला. गुरुवारी १३ इच्छुकांनी २५ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ५७ जणांनी ९७ अर्जांची उचल केली आहे.
बडनेरा मतदारसंघात गुरुवारी रमेश किसन आठवले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला.

Web Title: 24 candidates filed for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.