२३६ गावे मध्यम जोखमीची, ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड
By Admin | Updated: July 13, 2016 01:03 IST2016-07-13T01:03:36+5:302016-07-13T01:03:36+5:30
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ५ हजार ७४४ सार्वजनिक पाणि स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे.

२३६ गावे मध्यम जोखमीची, ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड
इशारा : जिल्हा परिषद आरोग्य विभाग नियंत्रणासाठी सज्ज
जितेंद्र दखने अमरावती
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ५ हजार ७४४ सार्वजनिक पाणि स्त्रोतांची तपासणी करण्यात आली आहे. यात मध्यम जोखमीस्तर असलेल्या २३६ गावांनाना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.पावसाळयाच्या तोंडावर पाणि स्त्रोतांकडे लक्ष देऊन ते दूषित कसे होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांनी आरोग्य विभागाला दिले.
जिल्ह्यात ८३९ ग्रामपंचायतीना असून जवळपास १६८७ गावे आहेत या गावात सार्वजनिक पाणि पुरवठयासाठी नळ माणि पुरवठा करणाऱ्या विहिरी, हातपंप असे एकूण ५७४४ पाण्याचे स्त्रोत्र आहेत.
या सुविधा मार्फत विविध गावामध्ये गावातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. यात पाणीपुरवठा करणाऱ्या सुविधांचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मे महिन्यात सर्वच १४ तालुक्यातील गावामधील पाणी स्त्रोतांची तपासणी केली आहे.त्यातून २३६ गावांना आरोग्य विभागाने पिवळे कार्ड दिले आहे.मध्यम जोखमीस्तर असलेल्या या ग्रामपंचायत निहाय गावांचा समावेश आहे.
ज्या गावांतील ७० टक्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात मध्यम जोखीम स्तरावरील स्त्रोतातून पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत असेल त्या ठिकाणच्या ग्रामपंचायरींना हे पिवळे कार्ड देण्यात आले आहेत. तसेच पावसाळयाच्या तोंडावर या पाणी स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवणे पाणी दृषीत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील ६०७ गावांना हिरवे कार्ड देण्यात आले आहे.