शुक्रवारी पुन्हा 233 पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:42+5:30

नागरिकांची समूह प्रतिरोधशक्ती निर्माण झालेली नसल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयाची प्रयोगशाळेत रॅपिड ॲन्टिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शुक्रवारी २३३ नवे कोरोनाग्रस्त आढळलयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. शहरी भागातच संक्रमित रूग्णांची वेगाने वाढ होत आहे.

233 positive again on Friday | शुक्रवारी पुन्हा 233 पॉझिटिव्ह

शुक्रवारी पुन्हा 233 पॉझिटिव्ह

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका वाढला, रुग्णसेवेत अवघे २०० कर्मचारी, ६०० जणांना केले कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोविडला प्रतिबंध करणारे लसीकरण वेगाने होत आहे. मात्र, नवीन वर्षात जानेवारीपासून कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याने ही बाब सार्वजनिक आरोग्य व त्यासाठी राबणाऱ्या यंत्रणेसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. शुक्रवारी २३३ संक्रमित रुग्ण आढळून आले असून, गत तीन दिवसांत एकूण पॉझिटिव्हीची संख्या ५७० झाली आहे.
नागरिकांची समूह प्रतिरोधशक्ती निर्माण झालेली नसल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढत असल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयाची प्रयोगशाळेत रॅपिड ॲन्टिजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शुक्रवारी २३३ नवे कोरोनाग्रस्त आढळलयाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली. शहरी भागातच संक्रमित रूग्णांची वेगाने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, नांदगाव व अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय, दयासागर दवाखान्यात संक्रमितांवर उपचारासाठी सुविधा आहे. होम आयासोलेशनमुळे हेल्थ केअर केंद्र बंद करण्यात आले आहेत.

आरोग्य यंत्रणेने ६०० कर्मचारी पाठविले घरी
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाची घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातून ६०० कंत्राटी कर्मचारी कमी केले. आता केवळ २०० कंत्राटी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी  दिलीप रणमले यांनी दिली. ग्रामीण भागातील १४  व अमरावती येथील दोन हेल्थ केअर सेंटर बंद करण्यात आले आहे.

रुग्णवाढ वेगाने
कोविडचा आलेख घसरत असला तरी जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ वेगाने होत आहे. त्याखालोखाल यवतमाळ, अकोला, भंडारा, नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे आरोग्य यंत्रणेची आकडेवारी आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा व दक्षतेबाबत मोहीम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

 

Web Title: 233 positive again on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.