२३ सातबाऱ्यांचे अवैध फेरफार
By Admin | Updated: January 17, 2016 00:11 IST2016-01-17T00:11:38+5:302016-01-17T00:11:38+5:30
भूदान चळवळीत ३ हजार १६३ एकर जमीन भूमिहीनांना वाटप करण्यात आली.

२३ सातबाऱ्यांचे अवैध फेरफार
अमरावती तालुक्यातील प्रकार : विशेष ‘ग्रामसभा’ बोलाविण्याची समितीची मागणी
गजानन मोहोड अमरावती
भूदान चळवळीत ३ हजार १६३ एकर जमीन भूमिहीनांना वाटप करण्यात आली. सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार १२५ सातबाऱ्यापैकी ६२ सातबाऱ्यांवरील भोगवटदार वर्ग बदलले आहेत. यामध्ये सर्वाधिक २३ फेरफार हे अमरावती तालुक्यात झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
भूदान जमीन भोगवटदार - वर्ग २ म्हणून नोंदविणे ही कायदेसंमत बाब आहे. प्राप्त माहितीनुसार अमरावती तालुक्यात सर्वाधिक ५३ पैकी २३ सातबाऱ्यामध्ये भोगवटदार - १ बदल करून फेरफार घेण्यात आले आहे. चांदूरबाजार २८ पैकी १४, भातकुली १४ पैकी १, अंजनगाव सुर्जी १२ पैकी १२, चांदूररेल्वे २ पैकी १, धामणगाव रेल्वे ७ पैकी ४, तिवसा ५ पैकी ३ व धारणी तालुक्यात ४ पैकी ४ ही सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग बदलले आहे. भूदानात मिळालेल्या जमिनीचे व्यवस्थापन शासनातर्फे भूदान यज्ञ अधिनियम १९५३ अन्वये केले जाते व याच अधिनियमाद्वारे शासन नियुक्त भुदान यज्ञ मंडळाकडे भूमीहीनांना जमिनीचे पट्टे देण्याची जबाबदारी असते. मात्र दरम्यानच्या काळात समितीचे दुर्लक्ष असल्याने तहसील व तलाठी कार्यालयात भूदान जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये भोगवटदार वर्ग बदलण्यात येऊन घोळ झालेला आहे.