२३ कोटींचा अर्थसंकल्प सादर
By Admin | Updated: March 25, 2015 00:09 IST2015-03-25T00:09:51+5:302015-03-25T00:09:51+5:30
जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाचे सन २०१४-१५ चे सुधारीत व सन २०१५/२०१६ चे मूळ अंदाजपत्रकास २ कोटी १७ लक्ष ५२ हजार ६०६ रुपयांचे शिलकिचे आणि

२३ कोटींचा अर्थसंकल्प सादर
अमरावती : जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाचे सन २०१४-१५ चे सुधारीत व सन २०१५/२०१६ चे मूळ अंदाजपत्रकास २ कोटी १७ लक्ष ५२ हजार ६०६ रुपयांचे शिलकिचे आणि २०१५-१६ चे मुळ अंदाजपत्रक अर्थ सभापती सतीश हाडोळे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मांडले. या अंदाजपत्रकात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. शिक्षण, महिला बालकल्याण , कृषी, समाज कल्याण आणि अपंगासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अर्थ सभापती सतीश हाडोळे यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे ,सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरुणा गोरले, सरिता मकेश्वर, सीईओ अनिल भंडारी, मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे सन २०१४-१५ चे सुधारीत अंदाजपत्रकानुसार एकूण महसूल उत्पन्न २३ कोटी २० लाख ६ हजार रुपयांचे असून सन २०१५-१६ ची अंदाजपत्रकीय मूळ उत्पन्न २३ कोटी २९ लाख ७२ हजार अपेक्षित आहे.
२०१४-१५ची एकूण महसूल जमा रक्कम १६ कोटी.२३ लाख ५७ हजार रुपये इतका आहे. असे सुधारीत आणि २०१५-१६ चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.