‘नो पार्किंग’मध्ये २३ कारवाया
By Admin | Updated: November 15, 2015 00:14 IST2015-11-15T00:14:33+5:302015-11-15T00:14:33+5:30
अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरील नो-पार्किंग झोनमध्ये नियमबाह्य वाहने लावणाऱ्या नागरिकांच्या २३ वाहनांवर शनिवारी कारवाई करण्यात आली.

‘नो पार्किंग’मध्ये २३ कारवाया
रेल्वे सुरक्षा दलाचा स्पेशल ड्राईव्ह : अकोल्यातून घ्यावी लागणार जमानत
अमरावती : अंबानगरीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरील नो-पार्किंग झोनमध्ये नियमबाह्य वाहने लावणाऱ्या नागरिकांच्या २३ वाहनांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. ही कारवाई बडनेरा व अमरावती रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी केली आहे.
दिवाळीनंतर लगेच पोलिसांनी पुन्हा कारवाईचा सपाटा चालविला आहे. सकाळपासून २३ वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून त्यांच्यावर १५९ रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली. त्यांना अकोला न्यायालयातून जमानत घेऊन दंड भरावा लागणार आहे.
अमरावती रेल्वे स्थानकावर नो-पार्किंग झोनमध्ये नागरिक बेशिस्त वाहने लावतात व पार्किंग झोनचा कंत्राट असलेल्या ठेकेदारांच्या कामगारांकडून वाहन चालकांकडून पठाणी वसुली करण्यात येत होती. पण ‘लोकमत’ने हा मुद्दा सर्वप्रथम लोकदरबारात मांडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करून येथे शिस्त लावली होती. लगातार आठ दिवस कारवाई करून १०० वाहनचालकांना दंड आकारला होता.
शनिवारी पुन्हा कारवाई झाली. ही कारवाई रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी. एच. पटेल, उपनिरीक्षक एस. जे. डोंगरे, पो. कां. संतोष शेट्टे, मिस्तर अहमद, संदीप कुमार यांनी केली. (प्रतिनिधी)