शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अमरावती जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत नव्याने आढळले २२६ कुष्ठरुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:37 IST

Amravati : हा कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला 'नोटिफायबल डिसीज' म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद आता दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग तसेच स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे आता सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक आहे. जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये २२६ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

हा कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. या आजाराचे निदान लवकर न झाल्यास आणि उपचारात विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे वेळेत निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग नियंत्रणाचे प्रमुख घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाने २०२७ पर्यंत 'कुष्ठरोगाचा शून्य प्रसार' हे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये संसर्गाची साखळी पूर्णपणे तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, मुलांमधील विकृतीचे प्रमाण शून्य करणे आणि कुष्ठरुग्णांविषयी समाजातील भेदभाव नष्ट करणे आदी बाबींचा समावेश आहे.

१७ नोव्हेंबरपासून शोधमोहीम पंधरवडा

जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये 'कुष्ठरुग्ण शोध अभियान' राबविण्यात येणार आहे. २०२७ पर्यंत 'शून्य कुष्ठरोग प्रसार' हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आरोग्य विभागाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

३३१ रुग्ण घेताहेत रुग्णालायत उपचार

जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल २२६ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ३३१ इतकी झाली आहे. तर एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये तब्बल ३८१ रुग्ण हे उपचारामुळे रोगमुक्त झाल्याची माहितीही कुष्ठरोग विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे कुष्ठरोगविभागाने याकरीता सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे यात यश मिळाले आहे.

"नागरिकांनी कुष्ठरोगाबाबत भीती बाळगू नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, कारण हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. केवळ वेळेत निदान आणि उपचार आवश्यक आहे. जिल्ह्यात सध्या ३३१ रुग्ण हे उपचाराखाली आहेत."- डॉ. पूनम मोहोकार, सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) अमरावती

English
हिंदी सारांश
Web Title : 226 New Leprosy Cases Found in Amravati District in Seven Months

Web Summary : Amravati recorded 226 new leprosy cases in seven months. The Health Department aims for zero leprosy by 2027, emphasizing early diagnosis and treatment. A leprosy detection campaign runs November 17th to December 2nd. Currently, 331 patients are under treatment.
टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्यMedicalवैद्यकीय