तीन पंचायत समितींमध्ये २२१ अर्ज दाखल
By Admin | Updated: November 8, 2014 22:30 IST2014-11-08T22:30:37+5:302014-11-08T22:30:37+5:30
जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूररेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण २२१ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवस्यात उमेदवारांची सर्वाधिक संख्या

तीन पंचायत समितींमध्ये २२१ अर्ज दाखल
पंचायत समिती निवडणूक : सर्वाधिक तिवस्यात, धामणगावात कमी उमेदवार
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूररेल्वे पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण २२१ उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहे. तिवस्यात उमेदवारांची सर्वाधिक संख्या असून धामणगाव तालुक्यात सर्वात कमी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तिवसा तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणांसाठी १०२ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यात वरखेड गणात २०, तिवसा २९, कुऱ्हा १४, मोझरी १२, मार्डा ५ तर वऱ्हा सर्कलमधून २२ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.
चांदूररेल्वे तालुक्यात एकूण ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यात राजुरा गणातून १६, घुईखेड १२, मालखेड ६, सातेफळ १०, आमला ९ तर पळसखेड गणातून १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच धामणगाव पंसच्या निवडणुकीत शनिवारी शेवटच्या दिवशी आठ गणांमधून ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात जुना धामणगावमधून सर्वाधिक ९ तर तळेगाव दशासर गणातून चार अर्ज प्राप्त झाले.
अंजनसिंगी सर्कलच्या सर्वसाधारण जागेसाठी अवधुत दिवे, भाजपतर्फे गणेश राजनकर, राष्ट्रवादीचे प्रवीण राजनकर, बसपचे सिध्दार्थ घरडे, अपक्ष उमेदवार वामन म्हात्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जुना धामणगाव सर्कलमधून काँग्रेसतर्फे अजय उत्तम तुपसुंदरे, भाजपचे सचिन गणेश पाटील, राष्ट्रवादीतर्फे विजय शेषराव बोरकर, बसपचे योगेश एकनाथ पाटील, शिवसेनेतर्फे प्रशांत वाल्मीक भगत, भारिपचे नरेश शेषराव काळबांडे, अपक्ष अनिल सोनटक्के, रवींद्र गवई, हनुमंत वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे़