तहसीलमधून २२ हजारांचे संगणक संत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:32+5:302021-08-22T04:15:32+5:30
ट्रकची एसटी बसला धडक नांदगाव खंडेश्वर : भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडके एसटी बसचे वाहकाच्या बाजूने नुकसान झाले. ही घटना ...

तहसीलमधून २२ हजारांचे संगणक संत लंपास
ट्रकची एसटी बसला धडक
नांदगाव खंडेश्वर : भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडके एसटी बसचे वाहकाच्या बाजूने नुकसान झाले. ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी शिंगणापूर टी पॉइंटवर घडली. गजानन बारकू बोडे (४९, एसटी चालक) यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी आरोपी संदीप रामईकबाल यादव (२६, पठकावली, उत्तर प्रदेश)विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
शेतातून स्प्रिंकलर पाईप, नोझल लंपास
आसेगाव पूर्णा : शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये ठेवलेले स्प्रिंकलर पाईप व ४० नोझल लंपास केल्याची घटना आसेगाव पूर्णा शिवारात १९ ऑगस्ट रोजी उघड झाली. शेतकरी देवानंद महिंगे यांच्या तक्रारीवरून संशयित विक्रम कृपाप्रसाद ऊर्फ बाळू नांदणे (२१, रा. वाकी रायपूर) विरुद्ध गुन्हा स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
-------------------------
चारचाकी वाहनाचालकाची वृद्धाला मारहाण
आसेगाव पूर्णा : रस्त्याने जात असलेल्या वृद्धाला चारचाकी वाहनचालकाने कट मारून पुढे वाहन उभे करून शिवीगाळ केली. वाद विकोपाला जाताच वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारून जखमी केले. अशोक मुकिंदराव धाकडे (६०, रा. सावळी बु.) यांच्या तक्रारीवरून आसेगाव पूर्णा पोलिसांनी एमएच ३१ ईएल ३६२५ चा चालक दीपक धानोरकरविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------