महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:16+5:302021-07-22T04:10:16+5:30

फोटो पी २१ महादेवखोरी अमरावती : महादेवखोरीतील वरुणनगरात २० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. जुने वैमनस्य ...

22-year-old killed in Mahadevkhori | महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची हत्या

महादेवखोरीत २२ वर्षीय तरुणाची हत्या

फोटो पी २१ महादेवखोरी

अमरावती : महादेवखोरीतील वरुणनगरात २० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. जुने वैमनस्य व क्षुल्लक वादातून बुधवारी दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. प्रणय मधुकर सातनुरकर (२०, रा. महादेवखोरी) असे मृताचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सूत्रांनुसार, प्रणयवर दोन ते तीन युवकांनी चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. यात त्याच्या गळ्यावर वार करण्यात आले. परिणामी, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तरुणांचा मोठा जमाव जमला असून, पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे बयाण नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली. काही प्रत्यक्षदर्शींनुसार मारेकऱ्यांची संख्या पाच ते सहाच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी रक्ताने माखलेली एक दुचाकी घटनास्थळाहूून जप्त केली आहे. या घटनेला जुन्या वैमनस्याची किनार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

गँगवारमधून हत्या?

प्राथमिक माहितीनुसार, महादेवखोरी व परिसरात ‘दादागिरी’ करणाऱ्या दोन टोळ्या आहेत. कुठल्या ना कुठल्या कारणावरून त्यांच्यात वाद होत असतात. काही तरुणांचा समावेश असलेली एक गँग दुसऱ्या गँगमधील तरुणांशी वाद करण्याकरिता जात असताना प्रणयचा बळी गेल्याचे सांगण्यात आले.

१ मृतक

२ फ्रेजरपुरा ठाण्यात एकत्र आलेला जमाव

३ रक्ताने माखलेली दुचाकी

Web Title: 22-year-old killed in Mahadevkhori