२२ हजार व्यक्ती गृह विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:44+5:30
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे.

२२ हजार व्यक्ती गृह विलगीकरणात
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात परदेशातून तसेच दिल्ली, नागपूर, मुंबई, पुणे व बाहेरून आलेल्या २२ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. वैद्यकीय पथके त्यांच्या सतत संपर्कात आहेत. या व्यक्तींच्या हातांवर शिक्का मारण्यात आलेला आहे. सर्वच तालुक्यातील आरोग्य पथक या व्यक्तींच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही दक्षतेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केलेल्या ३४८७ नागरिकांनाही होम व्कारंटाइन राहण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. या व्यक्तीरिक्त परदेशातून आलेले ११७ प्रवाशी नागरिकांची देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन यापैकी ९१ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्याही हातावर शिक्का मारण्यात आलेला आहे. यापैकी २७ नागरिकांना ‘फॅसिलिटी आयसोलेशन ’ करण्यात आलेले आहे.
बेघरांसाठी १४०० ठिकाणी भोजनाची व्यवस्था
या संचारबंदीच्या काळात राहण्याची व जेवण, पाण्याची व्यवस्था नसलेल्या बेघर नागरिकांना सुरक्षित राहता यावे, या हेतूने शासनाद्वारा जिल्ह्यात १००० ठिकाणी व खासगी संस्था, व्यक्तींद्वारा ४०० ठिकाणी नागरिकांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. अमरावती शहरात देखिल ठिकठिकाणी बेघरांसाठीच्या संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.
संचारबंदी असताना हजारो नागरिक आलेत कसे?
जिल्ह्यासह राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. गाव, तालुके, जिल्हा व राज्य सीमेवर चेक पॉर्इंट लावण्यात आलेले आहे. असे असताना देखिल जिल्ह्यात अधिकृत २२ हजार नागरिक आले. अनधिकृत किती याची माहिती प्रशासनाजवळ नाही. यासर्व बाबींचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधीत उपाययोजना जरी शासन राबवित असले, तरी अमंलबजावणी करणाºया यंत्रणेची पोलखोल या आकडेवारीने केली असल्याचे वास्तव आहे.