शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 14:01 IST

अंगावर वीज पडल्याने अमरावती जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात दोन, यवतमाळ जिल्ह्यात आठ, बुलडाणा जिल्ह्यात दोन व वाशिम जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देआपत्तीमध्ये ११४ जनावरेही दगावली

अमरावती : पश्चिम विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अंगावर वीज पडल्याने २२ व पुरात वाहून गेल्याने दोन अशा एकूण २४ जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय आपत्तीमध्ये लहान-मोठी ११४ जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहे. ४२ गोठे व १४०८ घरांची पडझड झालेली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काठालगतची १,१४९ हेक्टर शेतजमीन खरडली गेली, तर १७,९३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.

विभागात आतापर्यंत पावसाची २३२.६ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४५.५ मिमी पाऊस झालेला आहे. ही १०५.५ टक्के सरासरी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३६.८ मिमी, यवतमाळ २९५.३ मिमी, अकोला २१०.६ मिमी, बुलडाणा २१७.१ मिमी व वाशिम जिल्ह्यात २३८.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ५ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. ती अजूनही सुरूच आहे.

नागपुरात दहा दिवसांतच पडला जुलैचा ६५ टक्के पाऊस; यलो अलर्ट

यादरम्यान अंगावर वीज पडल्याने अमरावती जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात दोन, यवतमाळ जिल्ह्यात आठ, बुलडाणा जिल्ह्यात दोन व वाशिम जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला. तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरात वाहून गेलेली आहे. यापैकी १८ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाखांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे. बाकी प्रकरणे प्रलंबित आहेत.

१११ गावांमधील ८०४ कुटुंब बाधित

अतिवृष्टीमुळे विभागात अमरावती जिल्ह्यातील १११ गावे व ८०४ कुटुंब बाधित झाली. याची २,५५८ नागरिकांना झळ पोहोचली आहे. ४७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. आपत्तीमध्ये १४ व्यक्ती जखमी झाल्या. याशिवाय दुधाळ ३५, लहान ४८, ओढकाम करणारी ३१ जनावरे मृत झालेली आहेत.

१,४०८ घरांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे ३० घरांची पूर्णत: पडझड, १३९ घरांची अंशत:, १,२३९ कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ४२ गोठ्यांची देखील पडझड झालेली आहे. या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे अद्याप सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही. आपत्तीमुळे अमरावती जिल्ह्यात २.५० लाखांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूRainपाऊसVidarbhaविदर्भ