२२ दिवसांत ६०० किलोमीटरचे पांदण रस्ते पूर्ण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:22+5:302021-04-12T04:12:22+5:30
चांदूर बाजार परतवाडा : शेत शिवारातील पांदण रस्त्यांच्या पूर्णत्वाने ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. त्या ...

२२ दिवसांत ६०० किलोमीटरचे पांदण रस्ते पूर्ण करणार
चांदूर बाजार परतवाडा : शेत शिवारातील पांदण रस्त्यांच्या पूर्णत्वाने ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. त्या अनुषंगाने अचलपूर मतदारसंघात २२ दिवसांत ६०० किलोमीटर पांदण रस्ते पूर्ण केले जातील, यासाठी १४ एप्रिलला १४ पांदण रस्त्याचे भूमिपूजन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अचलपूर येथे पत्रपरिषदेत दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार उपस्थित होते.
१४ एपप्रि रोजी भूगाव, विरुळपूर्णा, हिरुळपूर्णा, शिरजगाव बंड, माधान, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगाव, कोठारा, बोपापूर, तुळजापूर, शिंदी इत्यादी ठिकाणी भूमिपूजन होणार आहे.
आता हे पांदण रस्ते फक्त आठ लाख रुपयांत एक किलोमीटरप्रमाणे तयार होणार आहे. त्यानुसार नवीन कमी खर्चाच्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम अचलपूर मतदारसंघाला पांदण रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अचलपूर मतदारसंघातील ६०० किलोमीटर नव्याने होणाऱ्या पांदण रस्ते, चांदूरबाजार तालुक्यातील २४३ किलोमीटर व अचलपूर तालुक्यातील २३७ किलोमीटर रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे. यात चांदूरबाजार तालुक्यातील २८६ व अचलपूर तालुक्यातील २७३ पांदण रस्त्यांचा समावेश आहे.