जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी २२ कोटींना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST2021-04-23T04:15:05+5:302021-04-23T04:15:05+5:30
गुरुवारी सांगितले. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत मूलभूत विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा ना. ठाकूर ...

जिल्ह्यात मूलभूत सुविधांसाठी २२ कोटींना मान्यता
गुरुवारी सांगितले. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या गावांतर्गत मूलभूत विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा ना. ठाकूर यांनी वेळोवेळी केला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेंतर्गत विविध विकासकामांसाठी एकूण २२ कोटी रूपयांचा निधी जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक खेडोपाडी रस्ते, पांदणरस्ते, नाली, पूल, स्मशानभूमी भिंत कुंपण, ग्रामपंचायतभवन, सभागृह बांधकाम वॉर्ड, सौंदर्यीकरण, खोलीकरण, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, रिटनिंग वॉल बांधकाम, पुतळा सौंदर्यीकरण, शेड अशी अनेक कामे त्यामुळे पूर्णत्वास जातील. संबंधित सर्व यंत्रणांनी गावागावांत मुलभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करावीत. यानंतरही अपेक्षित कामांचा वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल. जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
बॉक्स
मोर्शी तालुक्यात होणार विकासकामे
मोर्शी तालुक्यातील हिवरखेडमध्ये रस्ते, पांदणरस्ते, नाली, पूल, स्मशानभूमी भिंत कुंपण, ग्रामपंचायतभवन, वॉर्ड, सौंदर्यीकरण, खोलीकरण, पेव्हिंग ब्लॉक रस्ता, रिटनिंग वॉल बांधकाम, पुतळा सौंदर्यीकरण, शेड व मग्रारोहयो अभिसरणातील २८ कामांसाठी १७ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. बेलोना, उमरखेड, लाखारा, दापोरी, डोंगरपावली, घोडदेव, पाळा, सालबर्डी, धानोरा, तरोडा, भुईकुंडी, खानापूर, चिखलसावंगी, माणिकपूर, भाईपूर, मायवाडी, चिंचाचेली गवळी, अंबाडा, आष्टगाव, वरला, उतखेड, खेड, डोमक, तरोडा, आष्टोली, गणेशपूर, पिंपरी, अर्धमामणी, सायवाडा, कोळविहिर, रायपूर, दहसूर, दुर्गवाडा, पारडी, नशीदपूर, सिंभोरा, येवती, पिंपळखुटा मोठा, निंभी, तळणी, खोपडा, बोडणा, लाडकी, इनापूर, पिंपळखुटा लहान, येरला, आसोना, रिद्धपूर, ब्राम्हणवाडा, बऱ्हाणपूर, दाभेरी गावाचा समावेश आहे.
बॉक्स
वरुड, चांदूर बाजार, नांदगावलाही चालना
वरूड तालुक्यातील गोरेगाव, पांढरघाटी, नागझिरी, पळसोना, धामणधस, माणिकपूर, धनोडी, बहादा, मांगोना, तिवसाघाट, पिंपळशेडा, झटामझिरी, भेमडी मोठी, भेमडी लहान, वाळा, वाई खुई, सातनूर या गावांमध्ये रस्ते, पांदणरस्ते, नाली,पूल सौंदर्यीकरण व मग्रारोहयो अभिसरणांसाठी २८ कामांसाठी प्रत्येकी ७ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगाव व देवमाळी या प्रत्येक गावामध्ये अंतर्गत रस्ते व भूमिगत गटारांसाठी २५ लक्ष, अंतर्गत जोडरस्त्यांसाठी २५ लक्ष, सभागृहासाठी २५ लक्ष व रस्ता सौंदर्यीकरणासाठी २५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा ते धानोरा शिक्रा रस्त्यासाठी 35 लाख, महिमापूर येथील हनुमान मंदिराच्या सभागृह बांधकामासाठी १३ लाख निधी मंजूर आहे. बोरी व नागापूर येथेही सभागृहासाठी प्रत्येकी १३ लाख मंजूर आहेत.
बॉक्स
अंजनगाव तालुक्यातील विविध कामे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चौसाळा, तूरखेड, लखाड, टाकरखेडा मोरे, काकडा, देवगाव खोडगाव, चिंचोली बु., चौसाळा, पिंपळगव्हाण, डोंबाळा, निमखेड आडे, वरूड खु, काळगव्हाण, दर्यापूर तालुक्यातील राजखेड, एरंडगाव, शिरजदा, लासूर, वडनेर गंगाई, रामागड भुरस, अचलपूरमधील असदपूर, येसुर्णा, येवता, रावळगाव यासह जोगर्डी, खैरी, वासनी खु., टोंगलाबाद, मुन्हा, जसापूर, गोळेगाव, निमखेड बाजार, बोराळा, अडूळा बाजार, उमरी इतबारपूर, कोकर्डा, हयापूर, अंतरगाव ईटको, नांदेड बु., महिनापूर, कान्होली, सावळी, कातखेड, पोही, रामगड भु., पेठ ईतबारपूर, गायवाडी, धामोडी, घडा, करतखेडा, बेलोरा, थिलोरी, वासणी खुर्द, हसनापूर, गावंडगाव, म्हैसपूर, अडगाव खाडे आदी गावांमध्ये विविध सुविधांच्या कामांना चालना मिळणार आहे.
बॉक्स
तिवसा मतदारसंघातील कामांचाही समावेश
कठोरा येथील डांबरीकरण, खडीकरण, नालीचे बांधकाम, टोमय शाळा ते टाकळी रस्त्याचे बांधकाम, वाठोडा खुर्द येथील दोन रस्ते, बोर्डा, घोटा येथील सभागृहा , शेंदोळा, मार्डी येथे पेव्हिंग ब्लॉक, तळेगाव ठाकूला संविधान स्तंभ, वऱ्हाला आदिवासी भवनाचे बांधकाम, कौंडण्यपूरला सभागृहाचे बांधकाम, ममदापूर, रेवसा, कामुंजा, पालवाडी, वणी, सुलतानपूर, कुऱ्हा, अनकवाडी, मार्डी, मोझरी, माहुली जहाँगीर, पुसदा, देवरी, वरखेड, गुरुदेवनगर येथील सिमेंट काँक्रिट रस्ता, उंबरखेड, भिवापूर, शेवती येथील विविध कामे, तसे माळेगावला प्रवासी निवारा कठोरा बु., कुंड, करजगाव, नांदुरा किरकिटे, वाठोडा शुक्लेश्वर, वायगाव, बुधागड, पूर्णानगर, खोलापूर, निरूळ, साऊर, जळका, तुळजापूर, कवठाळ, विचोरी, घोडगव्हाण, रोहणखेडा, शिरखेड, काटपूर, धामणगाव, नेरपिंगळाई, निंभार्णी, हसीनपूर, पोरगव्हाण, आखतवाडा, तळेगाव या गावांमध्ये विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत.