निवडणूक रिंगणात २११ उमेदवार
By Admin | Updated: September 27, 2014 23:04 IST2014-09-27T23:04:49+5:302014-09-27T23:04:49+5:30
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत एकूण २११ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शनिवारी यातील १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

निवडणूक रिंगणात २११ उमेदवार
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत एकूण २११ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शनिवारी यातील १४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
मेळघाट मतदारसंघात आतापर्यंत ९ उमेदवारांनी १६ अर्ज दाखल केले. शनिवारी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. यात राष्ट्रवादीतर्फे राजकुमार दयाराम पटेल, शिवसेनेतर्फे मोतीलाल भय्यालाल कास्देकर, बसपतर्फे किसन जयराम जामकर, भारिप-बमसंतर्फे बंसी गुड्डू मावस्कर, केवलराम तुळशीराम काळे (अपक्ष), वासुदेव संजू धिकार, लक्ष्मण ओंकार धांडे या उमेदवारांचा समावेश आहे. रजनी चंदू बेलसरे यांनी दाखल केलेले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले. आतापर्यंत नऊ लोकांनी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले.
दर्यापूर मतदारसंघात आतापर्यंत ३१ उमेदवारांनी ५२ अर्ज दाखल केले. शनिवारी १८ उमेदवारांनी ३० अर्ज दाखल केले. यात रमेश बुंदेले (भाजप), गोपाल चंदन (मनसे), दिनेश बुब (राष्ट्रवादी), सिध्दार्थ वानखडे (काँग्रेस), भाऊ रायबोले (पीरिपा), राजेंद्र वानखडे (रिपब्लिकन सेना), भूषण खंडारे, विजय यशवंत विल्हेकर, सतीश वाकपांजर, क्षितीज अभ्यंकर, अविनाश गायगोले, संजय चक्रनारायण, बबन विल्हेकर, एजाज मोहम्मद शेर मोहम्मद, मनोहर सोनोने, नीलेश पारवे, पी.टी. खंडारे, काशीनाथ बनसोड यांचा समावेश आहे.
धामणगाव रेल्वे मतदारसंघात आतापर्यंत ३० उमेदवारांनी ३७ अर्ज दाखल केले.
शनिवारी १८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात अरुण अडसड (भाजप), सिध्देश्वर चव्हाण (शिवसेना), शरद सुरजुसे (भाकप), संजय मडावी (गोंडवाना गणतंत्र पार्टी), अनिल आठवले (राष्ट्रवादी), रमेश वैद्य (खोरिप), अनिल वरघट (रिपाइं गवई), मधुकर शेलारे (भारिप-बमसं), विनोद शिंगणापुरे (बहुजन मुक्ती पार्टी, उध्दव पारवे (रिपाइं) व अपक्षांमध्ये प्रकाश चवरे, जयकिसन मते, संजय पुनसे, प्रमोद खडसे, दिनेश अंभोरे, प्रशांत सोरगीवकर, मेहबूब हुसेन म. हुसेन व महेंद्र गजभिये यांचा समावेश आहे.
अचलपूर मतदारसंघात शनिवारी ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
ंशेवटच्या दिवशी दिग्गजांची उमेदवारी
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये बच्चू कडू (प्रहार), सुरेखा ठाकरे (शिवसेना), अशोक बनसोड (भाजप), वसुधा देशमुख (राष्ट्रवादी), बबलू देशमुख (काँग्रेस), हाजी मो. रफीक (बसप), प्रफुल्ल पाटील (मनसे) आदींचा समावेश आहे.
तिवसा मतदारसंघात आतापर्यंत २५ उमेदवारांनी ५२ अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये निवेदिता चौधरी (भाजप), साहेबराव तट्टे (राष्ट्रवादी), दिनेश वानखडे (शिवसेना), इंद्रजित नितनवार, राजू ब्राम्हणेकर (रिपाइं), आकाश वऱ्हाडे (मनसे), सुभाष गोहत्रे (बहुजन मुक्ती पार्टी), संजय देशमुख (प्रहार), संयोगिता निंबाळकर, चंद्रशेखर कुरळकर, प्रदीप राऊत (राष्ट्रवादी), भारत तसरे, नाना मालधुरे, देवीदास निकाळजे, रमेश मातकर, संतोष महात्मे, अजिज पटेल, मिलिंद तायडे, कैलाश सोनोने, साहेब खॉ यांचा समावेश आहे.
मोर्शी मतदारसंघात एकूण २८ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात नरेशचंद्र ठाकरे (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पंडीतराव देशमुख (मनसे), मृदूला श्रीकांत पाटील (बसप), अरुण चव्हाण (भारिप-बमसं), उमेश आत्माराम यावलकर (शिवसेना), अनिल उत्तमराव खांडेकर (प्रहार), मंजूषा अनिल खांडेकर (प्रहार), तसेच विजय कोकाटे, मोरेश्वर वानखडे, विनायक वाघमारे, सुमित्रा गायकवाड, प्रदीप चोपडे, चंद्रकात कुमरे, अनिता मसाने, संदीप अशोकराव रोडे, शाम लक्ष्मणराव बेलसरे, अशोक रोडे या अपक्षांनीसुध्दा नामांकन दाखल केले.
बडनेरा मतदारसंघात आतापर्यंत २६ उमेदवारांनी ३९ अर्ज दाखल केले. शनिवारी १७ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले आहेत. यात रवी राणा, सुलभा खोडके (काँग्रेस), नितीन मोहोड (बहुजन विकास आघाडी), तुषार भारतीय (भाजप), रवी वैद्य (बसप), निर्मला सुदाम बोरकर (बसप), सुखदेव मेश्राम, कृष्णा गणवीर, अब्दुल मजीद शेख मेहमूद, वनिता सौदागरे, प्रवीण डांगे (मनसे), ताराचंद लोणारे (खोरिप), रुपराव मोहोड (आंबेकरवादी रिपब्लिकन), सुनील गजभिये, अतुल झंझाळ (बहुजन मुक्ती पार्टी), सचिन इंगोले यांचा समावेश आहे.
अमरावती मतदारसंघात आतापर्यंत ३३ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल केले. शनिवारी २० उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले. यात रावसाहेब शेखावत (काँग्रेस), सुनील देशमुख (भाजप), सपना ठाकूर (राष्ट्रवादी), भूषण बनसोड (रिपाइं), धनराज कावरे (खोरिप), गणेश खारकर (राष्ट्रवादी), मो. शरीफ मो. याकुब (भारिप-बमसं), मो. इमरान मो. याकुब (इंडियन मुस्लिम लिग), रवींद्र राणे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन माकोडे, शेख सुलतान शेख फकीरा, किशोर हरमकर, समीर देशमुख, सुमन जिरापुरे, महेश तायडे, ज्योती काकणे, उमाशंकर शुक्ला, शेख अयुब शेख भुड्डू आदींचा समावेश आहे.