ऑनलाईन बोलावलेल्या २१ तलवारी, एक पिस्टल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST2021-02-26T04:18:19+5:302021-02-26T04:18:19+5:30

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी जयसियाराम नगरातील एका युवकाच्या घराची झडती घेतली. त्याच्या ताब्यातून दोन तलवार व लोखंडी ...

21 swords called online, one pistol seized | ऑनलाईन बोलावलेल्या २१ तलवारी, एक पिस्टल जप्त

ऑनलाईन बोलावलेल्या २१ तलवारी, एक पिस्टल जप्त

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी जयसियाराम नगरातील एका युवकाच्या घराची झडती घेतली. त्याच्या ताब्यातून दोन तलवार व लोखंडी बॅरल असलेले एअर पिस्टल जप्त केली. त्याने ऑनलाईन आर्डरनुसार बोलावलेल्या २१ तलवारी इतरांना विकल्याची माहिती पोलिसांना मिळताच चार आरोपींच्या घराची झडती घेऊन २१ तलवारींसह एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी बुधवारी जप्त केला.

अक्षय प्रमोद इंगळे (२०, जयसियारामनगर), सुनील निकोसे, गोलू ऊर्फ मयूर दीपक चढार(२०, रा. संतोषीनगर), देवेंद्र ऊर्फ विक्की संजय बागडे (२७, रा. बेलपुरा) असे आरोपीचे नाव आहे. यातील आरोपी अक्षय इंगळे यांच्या घरी तलवारी लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून दोन तलवारी व एक ऐअर पिस्टल दिसून आली. त्याने पंजाब राज्यातील अमृतसर येथून ऑनलाईन ऑर्डर करून बोलावलेल्या तलवारी अन्य चार आरोपींना विकल्या. पोेलिसांच्या त्यांच्या घराची झडती घेऊन सदर तलवारी जप्त केल्या. तसेच यातील फरार आरोपी सुरेश काशीनाथ यादव (२७, रा. शोभानगर) याच्या घराची झडती एऊन एक तलवार जप्त केली व आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा सहकलम ३/२५ ,४/२५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह, उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात एपीआय महेश इंगोले, डीबी पथकातील शेखर गेडाम व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: 21 swords called online, one pistol seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.