महसूलचे २१ अधिकारी, कर्मचारी सन्मानित
By Admin | Updated: August 3, 2016 00:04 IST2016-08-03T00:04:25+5:302016-08-03T00:04:25+5:30
महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावर सन २०१४-१५ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ..

महसूलचे २१ अधिकारी, कर्मचारी सन्मानित
महसूल दिन : सन २०१४-१५ मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी गौरव
अमरावती : महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावर सन २०१४-१५ या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या २१ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रभारी विभागीय आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त राजेश मावस्कर, पुरी, अप्पर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी उपस्थित होते. यामध्ये उपजिल्हाधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार श्रीकांत ऊंबरकर, एम.एम. जोरवार, नायब तहसीलदार आर. पी. वानखडे, लघुलेखक उछचश्रेणी, महेंद्र गायकवाड, लघुलेखक निम्नश्रेणी रवींद्र मोहोड, चंद्रकांत धकीते, अन्वल कारकून, आर.डी. नेरकर, उमेश निमकांडे, कनिष्ठ लिपिक विजय सूर्यवंशी, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, ए. एन. डव्हळे, तलाठी प्रवीण कावलकर, महेश धानोरकर, शिपाई रमेश मोरे, अशोक जाधव, कोतवाल, दिनकर गवई, आर.के. खरात यांना गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)